shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

वडार समाज युवा नेते गोपाळ उर्फ काळू आण्णा कुसळकर यांच्या वतीने 80 कुटुंबीयांना मोफत किराणा वाटप

शेवगाव/ प्रतिनिधी:

गोपाळ उर्फ काळू आण्णा कुसळकर

शेवगाव तालुक्यातील रहिवासी असलेले युवा नेते गोपाळ कुसळकर यांनी वार्ड क्रमांक 15 वडार गल्ली येथे 80 कुटुंबातील गोरगरीब जनतेला मोफत किराणा वाटप केले.तसेच यावेळी सोशल डिस्टंन्स चा नियम पाळण्यात आला आणि कुठलाही फोटो वगैरे काढला नाही,गोपाळ कुसळकर  यांनी संकल्प केला आहे की यापुढेही कोरोनाचे संकट जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत आपण वैयक्तीक आणि समाजातील सर्व मार्गदर्शकांच्या सहकार्याने गरजू व्यक्तीना मदत करणार असल्याचे सांगितले तसेच आज सद्यस्थितीत गरिब आणि कामगार लोकांना हाताला काम नसल्याने अनेक कुटुंब बेरोजगार झाले आहे आणि घरामध्ये पैसे येण्याची कुठल्याही प्रकारची संधी नाही आणि अशा संकटात गरजू व्यक्तीला मदतीचा हात देताना एक वेगळाच आनंद पहायला मिळाला आणि ज्या ज्या कुटुंबाला मी मदत केली त्या कुटुंबाला देखील आनंद झाला आणि  माझ्या तरून मित्रांनी देखील असेच सामाजिक काम हाती घेऊन समाजकारण करावे असे आवाहन युवा नेते गोपाळ कुसळकर यांनी केले यावेळी वडार समाज्याच्या हितासाठी नेहमीच झटणाऱ्या सर्व जेष्ठ मार्गदर्शक उपस्थित होते. त्यांनीही मोठ्या प्रमाणात सहकार्य केले यावेळी गोपाळ कुसळकर यांनी समाजबाधवांचे आभार मानले.गोपाल अण्णा कुसळकर यांचे वडार समाजाच्या वतीने मनापासुन आभार व धन्यवाद मानण्यात आले.
close