shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पार्सल पध्दतीने दारु विक्रीस परवानगी द्यावी: आप्पासाहेब ढुस, देवळाली प्रवरा


  • वाइन शॉप सह बार/परमिट रूम मध्ये 25% अतिरिक्त कर आकारुन पार्सल पध्दतीने दारु विक्रीस परवानगी द्यावी व कमी गर्दीत महसूल वृद्धी साधावी 


देवळाली प्रवरा - दि. 05
सरकारने राज्यातील वाइन शॉप सह  बार/परमिट रूम मध्ये 25% अतिरिक्त कर आकारुन पार्सल पध्दतिने दारु विक्रीस परवानगी द्यावी व कमी गर्दीत महसूल वृद्धी सधावी असी मागणी देवळाली प्रवरा येथील आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस यांनी मुख्यमंत्री ना. श्री उद्धवजी ठाकरे यांना आज दि. 5 मे रोजी दू. 01.40 वा.  ई मेल द्वारा पाठविलेल्या विनंती पत्रात  म्हंटले आहे.




ढुस यांनी पाठविलेल्या निवेदनात पुढे म्हंटले आहे की, कोरोनाचे पार्श्वभूमीवर खास जनतेच्या आग्रहस्तव व राज्याच्या महसुलात भर पडावी म्हणून राज्य सरकारने राज्यात वाइन शॉप उघडण्यास आज परवानगी दिली आहे.



तथापी राज्यातील प्रत्येक तालुक्यात असलेल्या वाइन शॉप ची अपुरी संख्या पाहता प्रत्येक वाइन शॉप समोर कित्येक किलोमीटर लांब पर्यंत वाइन खरेदीसाठी लोकांची झुंबड उडत आहे. व त्यामूळे सुरक्षित अंतराचा नियम मोडला जावुन कोरोनाचे संकट व त्याची भिती वाढू लागली आहे. म्हणून मी स्वताः जरी निर्व्यसनी असलो तरी कोरोनाच्या संकटा पासून जनतेला वाचविण्यासाठी आणि आजचे रज्यावरील आर्थिक संकट पाहता  राज्याच्या महसुलात भर घालण्यासाठी अश्या दोन्ही उद्देश्याने नाविलाजास्तव अपणनास मी याविषयी विनंती वजा सुचना करीत आहे.

म्हणून सरकारने जर वाइन शॉप सह  जर बार/परमिट रूम मध्ये सुद्धा 25% अतिरिक्त कर आकारुन पार्सल पध्दतिने दारु विक्रीस योग्य त्या नियम अटीसह  परवानगी दिली तर सरकारचा प्रतीदीन काही कोटी रुपयांनी महसूल वाढेल आणी लोकांची एकाच दुकानावर पडणारी गर्दी कमी होवुन कोरोना संसर्ग बद्दल लोकांच्या मनातील भिती कमी होईल.

तरी अपणास विनंती की, राज्यातील  बार/परमिट रूम मध्ये 25% अतिरिक्त कर आकारुन पार्सल पध्दतिने दारु विक्रीस परवानगी देवून कमी गर्दीत महसूल वृद्धी साधने साठी आवश्यक ती उपाययोजना करने कामी संबंधीत विभागाला योग्य ते आदेश द्यावेत असे ढुस यांनी म्हंटले आहे.

आत्तापर्यंत आम्ही मागणी केलेल्या बहुतेक सर्व  मागण्या राज्याचे कार्यक्षम  मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांनी तात्काळ मान्य केल्या असलने या मागणीलाही प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा आप्पासाहेब ढुस यांनी व्यक्त केली.
close