राहुरी- माऊट अबू येथे सत्संग साठी गेलेल्या भाविकांना घर वापसी साठी मोलाचे सहकार्य देणार्यांप्रती आम्ही कृतज्ञ असल्याचे मत प्रजापिता ब्रम्हाकुमारीज ईश्वरीय विश्व् विद्यालयाच्या देवळाली प्रवरा येथील शाखा प्रमुख ब्रम्हाकुमारी विजया दिदि यांनी व्यक्त केले.
राहुरी तालुक्यातील प्रजापिता ब्रम्हाकुमारीज ईश्वरीय विश्व् विद्यालय यांच्या मार्गदर्शनाखाली राजस्थान माउंटआबू प्रजापिता ब्रह्मकुमारीज विश्व् विदयालय येथे दोन महिन्या पुर्वी गेलेले राहुरी तालुक्यातील २९ स्री, पुरुष यांचा १ ते १२मार्च पर्यंत कोरोनटाईन कालावधी समाप्त झाला राहुरी येथील राजयोग भवन येथून सर्वाना वैद्यकीय अधीक्षक - ग्रामीण रुग्णालय, राहुरी यांनी तपासणी अंती राहुरी चे तहशिलदार फसियोद्दीन शेख यांचे मार्गदर्शनाखाली घरी सोडण्यात आले आहे. त्या प्रसंगी दिदी यांनी मनोगत व्यक्त केले
त्या म्हणाल्या की, जवळपास ९ मार्च पासून आम्ही सर्वजण राजस्थान येथील माउंटआबू प्रजापिता ब्रह्मकुमारीज विश्व् विदयालय येथे धार्मीक कार्यासाठी गेलो व कोरोना च्या लॉक डाऊन मधे सर्वजण अडकून पडलो. तेथून घरी परत येण्यासाठी व आम्हाला राहुरी मधिल केन्द्रात सुखरुप परतण्यासाठी महाराष्ट्र शासनासह राहुरीचे तहशिलदार फसियोद्दीन शेख , देवळाली प्रवरा येथील आंतरराष्ट्रीय खेळाडू व राहुरीचे संपर्क समन्वयक आप्पासाहेब ढुस, पत्रकार शिवाजी घाडगे, उद्योजक गणेश भांड यांनी सर्वतोपरी सहकार्य केले. व राहुरी येथे आल्यावर राहुरी चे पोलिस निरिक्षक मुकुंद देशमुख साहेब व त्यांचे सर्व सहकारी, वैद्यकिय अधिकारी डाॅ नलिनी विखे व त्यांचे सर्व सहकारी या सर्वानी केलेल्या सहकार्या बद्दल आम्ही कृतज्ञता व्यक्त करत व सर्वांना धन्यवाद दिले.
या प्रसंगी राहुरी येथील प्रजापिता ब्रम्हा कुमारी इश्वरिय विश्व विद्यालयचे शाखा प्रमुख ब्रम्हाकुमारी नंदा दिदि यांचे हस्ते आंतरराष्ट्रीय खेळाडू तथा राहुरी तालुक्याचे संपर्क समन्वयक आप्पासाहेब ढुस यांना इश्वरिय संदेश साहित्य देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी पत्रकार शिवाजी घाडगे तसेच देवळाली प्रवरा येथील शाखा प्रमुख ब्रम्हाकुमारी विजया दिदि, वांबोरी येथील शाखा प्रमुख ब्रम्हाकुमारी मोना दिदी. आदी उपस्थीत होते..


