धक्कादायक..!! येवल्यात कोरोनाचा कहर :
येवला । प्रतिनिधी(संतोष राऊळ): संपुर्ण जगभरासह आपल्या राज्यातही कोरोना वैश्विक महामारीने रौद्ररुप धारण केले आहे.शासनस्तरावर विविध आदेशान्वये समाजजागृती केली जात आहे,परंतू अनेकांना कोरोना वैश्विक महामारीचे गांभिर्य कळत नाही त्यामुळे अनेकजण नाहक रस्त्यावर भटकताना दिसत आहेत.
येवले शहरात 7 कोरोना बाधित रुग्णांची संख्या असताना काल पर्यंत या संख्येत अजून 2 रुग्णांची वाढ झाली होती.यामुळे शहरात बऱ्याच भागात महानगरपालिके तर्फे नागरिकांचे युध्दपातळीवर सर्वेक्षण चालू असतानाच काही संशयित तसेच कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या 35 व्यक्तींचे रिपोर्ट आज आले. त्यातील 16 व्यक्तींचे रिपोर्ट हे पॉसिटीव्ह आल्यामुळे आता शहरात कोरोना रुग्णांची धक्कादायकपणे एकूण संख्या 25 झाली आहे. यात गावातील नागरिकांबरोबरच ग्रामीण रुग्णालयातील काही कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

