shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

लाॅकडाऊनमुळे सर्वत्र सुकटीचा तुटवडा - कोळी समाज आर्थिक संकटात, तर सुकटप्रिय मंडळींना आगोटची चिंता

बोरघर / माणगांव ( विश्वास गायकवाड ) सुकट अर्थात सुकी मच्छी म्हणजे कोकणातील जनतेच्या दैनंदिन आहारातील एक अविभाज्य घटक, या मध्ये प्रामुख्याने बारीक सुकट, अंबाडी, मासे सुकट, बोंबील, वाकटी , म्हाकळी,बगी, खारे मासे इत्यादींचा खाद्य संस्कृती मधील खजाना म्हणजे सुकट.  लाॅकडाऊनमुळे या सुकटीचा सद्या बाजारात सर्वत्र तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे कोकणातील तमाम सुकटप्रिय खाद्य रसिकांची खाण्याची मोठी गोची निर्माण झाली आहे. तर सुकटीचा व्यवसाय करणारा कोळी समाज आर्थिक संकटात.  कोकणातील तमाम सुकटप्रिय मंडळी पावसाळ्यातील चार महिन्यां साठी म्हणजे आगोटीला या सुकटीचा ग्रामीण भागातील सर्व लोक आपापल्या घरात साठा करून ठेवतात. मात्र कोरोना मुक्तीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लावलेल्या लाॅकडाऊन संचारबंदी मुळे सद्या सर्व ठिकाणच्या बाजारात मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे कोकणातील सर्व सुकटप्रिय खवय्यांना आगोटीसाठी सुकटीचा साठा करता येणार नाही त्यामुळे तमाम सुकटप्रिय मंडळी सद्या चिंतेत आहे. तर दुसरीकडे सुकटीचा व्यवसाय करणारा कोळी समाज आर्थिक संकटात सापडला आहे.



मुंबईसह कोकणातील ग्रामीण भागात सुकटीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू असतो. या व्यवसायातून दररोज लाखो करोडो रुपयांची उलाढाल होत असते. मुंबई मध्ये भाईंदर, मरोळ , शिवडी आदी ठिकाणी सुकटीचा किरकोळ आणि घाऊक स्वरूपातील मोठ्या प्रमाणात व्यवसाय सुरू असतो. तर कोकणातील अलिबाग, म्हसळा, श्रीवर्धन येथील दिघी, भरडखोल, जिवना बंदर, महाड, रत्नागिरी आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात सुकटीचा व्यवसाय चालतो. या ठिकाणाहून देश विदेशात सर्वत्र सुकटीचा अर्थात सुक्या मच्छीचा पुरवठा होत असतो.

या वर्षी कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात सर्वत्र सरकारने लावलेल्या लाॅकडाऊन संचारबंदी मुळे वरील सर्व ठिकाणचा सुकटीचा व्यवसाय पुर्ण पणे ठप्प झाला आहे. त्यामुळे तमाम सुकटप्रिय मंडळींची मोठी गोची निर्माण झाली आहे. त्यांना बाजारात मुबलक प्रमाणात कुठेही सुकट मिळत नसल्यामुळे आगोटीसाठी अर्थात पावसाळ्यातील चार महिन्यांसाठी आपापल्या घरात दरवर्षी प्रमाणे सुकटीचा साठा करून ठेवता येणार नाही. यामुळे तमाम सुकटप्रिय खवय्ये चिंतेत आहेत. तर दुसरीकडे या सुकटीचा व्यवसाय करणारा कोळी समाज लाॅकडाऊन मुळे सुकटीचा व्यवसाय ठप्प झाल्यामुळे आर्थिक संकटात सापडला आहे.
close