shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अज्ञात वाहनाच्या धडकेत येवला येथील दोन तरूणांचा मृत्यू...

येवला | प्रतिनिधी(संतोष राऊळ):
 येवला-मनमाड रोडला सावरगांव नजीक रात्री 12.30 ला अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकी वाहनावर असणाऱ्या  दोन तरुणांचा मृत्यू झाला. याबाबत सविस्तर माहिती अशी आहे कि रात्री 12.30 च्या सुमारास मृत तरुण प्रणव उबाळे रा.येवला (वय 18) आणि सिद्धार्थ पगारे रा. मनमाड (वय 18) हे येवला-मनमाड रोडला  दुचाकी वरून जात असताना एका अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्याने यातील प्रणव उबाळे याचा जागीच मृत्यू झाला तर सिद्धार्थ पगारे हा गंभीर जखमी झाला असताना त्याला रात्री 1.30 च्या सुमारास ग्रामीण रुग्णालय येवला येथे उपचारासाठी आणण्यात आले. यावेळी महिला डॉ.दामोदरे यांची ड्युटी असताना त्या अनुपस्थित होत्या. डॉक्टरांना संपर्क करून देखील ते रुग्णालयात आले नाही. त्यामुळे उपस्थित असलेले परिचारक चाटे चांगदेव,  कर्मचारी जोशी यांनी प्राथमिक उपचार करून अपघातग्रस्त तरुणाला नाशिक येथे घेऊन जाण्यास सांगितले.नाशिकला जात असताना निफाड जवळ हा दुसरा तरुण सिद्धार्थ पगारे याचा मृत्यू झाला. यामुळे येवला ग्रामीण रुग्णालयाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.
      
सदर अपघातात घरातील तरुण आणि एकुलते एक असलेले मुलं दगावल्यामुळे मृत तरुणांच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला असून ते राहत असलेल्या परिसरात देखील शोककळा पसरली आहे.
close