हिंगोली/प्रतिनिधी(विश्वनाथ देशमुख)
दि.4,हिंगोली जिल्ह्यातील सेनगांव शहरात एका 35 वर्षीय अविवाहित मंतीमंद महिलेवर बलात्कार करून गर्भवती केल्याप्रकरणी संशयीत आरोपी रमेश अर्जुनराव लांडे(35) याला सेनगांव पोलीसांनी ताब्यात घेऊन सेनगांव न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चार दिवसाची पोलीस कोठडी दिली होती तो संशयीत आरोपी सध्या 14 दिवसीय न्यायालयीन कोठडीत असुन आज दि.05 जुन शुक्रवार रोजी दुसरा संशयीत आरोपी विठ्ठल दत्तराव अंभोरे यास सेनगांव पोलीसांनी सेनगांव न्यायालयात हजर केले असता त्याला 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी देण्यात आली असल्याची माहीती पोलीस उपनिरीक्षक बाबुराव जाधव यांनी शिर्डी एक्सप्रेस न्युज शी बोलतांनी दिली.
सेनगांव शहरातील मतीमंद अविवाहित महिलेवर बलात्कार करून तीला गर्भवती केल्याप्रकरणी संशयीत आरोपी रमेश अर्जुनराव लांडे याला अटक करून सेनगाव न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला चार दिवसाची पोलीस कस्टडी दिली होती.आता तो संशयीत आरोपी न्यायालयीन कोठडीत असुन परभणी कारागृह येथे आहे.संबंधित पिडीत मतीमंद महिलेच्या जबानीनुसार दुसरा संशयीत जि.प.शालेय समितीचा सदस्य आरोपी विठ्ठल दत्तराव अंभोरे(35) याला सेनगांव पोलीसांनी ताब्यात घेऊन त्याला सेनगांव न्यायालयात आज दि.05 जुन शुक्रवार रोजी हजर केले असता न्यायालयाने 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.पुढील तपास सेनगांव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सरदारसिंग ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बाबुराव जाधव हे करीत आहेत


