shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

विमलताई जोगदंड यांनी बनवला स्व:खर्चातून रस्ता .....!!

विमलताई जोगदंड यांनी बनवला स्व:खर्चातून रस्ता .....!!   

 केज  |  प्रतिनिधी :
(प्रकाश मुंडे)          

केज शहरातील फूलेनगर भागातील सामाजिक कार्यकर्त्या विमलताई बालासाहेब जोगदंड यांनी आज सामाजिक बांधिलकी जपत वार्ड क्रमांक सात मधील येत असलेल्या जलाल नगर भागात रस्त्यांची झालेली बकाल अवस्था पाहून व या नंतरच्या काळात पण होणाऱ्या पावसाळ्यातील दुरावस्था लक्षात घेऊन स्वखर्चाने आज या भागातील नागरीकांच्या सोयी साठी रस्ता बनवून एक आदर्श निर्माण केला आहे. 

या भागातील नागरिकांच्या प्रत्येक सूख दूख्खात विमलताई बालासाहेब जोगदंड या नेहमीच अग्रेसर असतात. प्रत्येक समाज कार्य असो किंवा ईतर लोंकाची कामे त्या सोडवण्यासाठी विमलताई नेहमीच दोन पाऊल पुढे असतात. फूलेनगर भागातील नागरिक या त्यांच्या कामाच्या वेगामुळे जाम खुष आहेत. जलाल नगर भागातील रस्त्याच्या उदघाटनाला या भागातील प्रतिष्ठीत नागरिक इनामदार बसीरूद्दीन साहेब, शेख चाॅंदपाशा साजिद, भैया बागवान, अशोक गायकवाड, जयद्रथ मस्के, अन्वर आतार, नय्युम भैया शेख, अलीभैय्या शेख, मुस्तकीम खतीब सर, अमीर पटेल, सिराज शेख, मयूर पाटील, सुहास समुद्रे, अभिजीत तुपारे, राहुल ईनकर, गणेश गालफाडे, त्र्रूषीकेश सोनवणे, केतन घोडके, अनिकेत समुद्रे, सूरज आचार्य, हर्षवर्धन कांबळे, यश सिरसट, प्रेम मस्के, रितेश डोंगरे, संदेश ताकतोडे, रूतीक सोनवणे, किरण आचार्य, अमन खंडाळे, पवन गालफाडे, अंश सिरसाट, आर्यन बचूटे, अनूप खंडाळे, खंडाळे आदित्य, समुद्रे आदित्य, जानवे राहुल, पवार ,ओम शिनगारे, व रूषीकेस सिरसट सह L. F. C. ग्रूप व मिलिंद सागर यूवा प्रतिष्ठान सह फूलेनगर भागातील विमलताई जोगदंड महिला मंडळ मोठ्या प्रमाणात लाॅकडाऊन च्या काळात सोशल डिस्टेसिंग पाळून उपस्थित होते.  

या वेळी आमच्याशी बोलताना विमलताई जोगदंड म्हणाल्या की या भागातील नागरिकांच्या प्रत्येक अडीअडचणी वेळी मी मदतीचा हात देण्यात या पुढेही कमी पडणार नाही.या त्यांच्या सामाजिक कार्यामुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे.
close