shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

10 ऑगस्ट(आज) व 11 ऑगस्ट (उद्दा )केज शहराचे सर्व व्यवहार सुरू राहतील ..! महादेव सूर्यवंशी यांचे जनतेला आवाहन ...!!

केज ।  प्रतिनिधी  ( प्रकाश मुंडे)  :- 
केज शहर व तालुक्यातील सर्व व्यापारी बांधव आणि सर्व नागरीक  आपणास ठाऊक आहे कोरोना महामारी संसर्ग केज शहर व तालुक्यात वाढत आहे. 
                     मा. महादेव सुर्यवंशी 

याकरिता या विषाणू संसर्गाची साखळी खंडित करण्यासाठी आपण सर्वांनी 8 ऑगस्ट  ते  13 ऑगस्ट या काळात स्वयंमस्फुर्त बंद घोषित करून त्याची अत्यंत काटेकोरपणे पालन सुरू केले होते. गेली दोन दिवस ज्या उद्धेशाने आपण कडकडीत बंद पाळून कृतीतून आपल्या समाजाच्या सुरक्षेची काळजी कोणताही शासन आदेश नसताना घेतली ही बाब आमचा भविष्यातील एकमेकाप्रति असणारा  विश्वास व आपुलकी वाढवणारा आहे. संकटकाळी आम्ही एकमताने चांगला निर्णय घेऊन प्रत्यक्ष कृतीत आणू शकतो याची खात्री पटली आहे.

आजच बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मा .राहुलजी रेखावार साहेब यांनी काढलेल्या विशेष आदेशाद्वारे केज शहर येत्या 12 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट पर्यंत बंद राहणार असल्याचे कळवले आहे. ही बाब लक्षात घेऊन व्यापारी महासंघाचे पदाधिकारी व नागरिकांची तातडीची बैठक घेऊन 10 ऑगस्ट व 11 ऑगस्ट या दोन दिवसांसाठी आपण प्रस्तावित केलेला या दोन दिवसाचा बंद आपण जनतेच्या अत्यावश्यक  गरजा पुर्ण करण्यासाठी मागे घेणे आवश्यक असल्याचे ठरले आहे. 

यानुसार आपण केज शहर व तालुक्यातील सर्व व्यवहार 10 व 11 ऑगस्ट रोजी नियमित चालू  करण्याचे ठरवले आहे. तरी  या दोन दिवसात आपले व्यवहार आज व उद्या  सुरू करावेत. ज्यांना स्वयंस्फूतपणे बंद ठेवायचा असेल त्यांना कोणतीही सक्ती किंवा विनंती असणार नाही.(कांही व्यापारी बांधवांनी स्वतःच निर्णय घेतले आहेत)

मात्र या दोन दिवसांच्या काळात नागरिकांनी अत्यावश्यक कामासाठीच बाहेर यावे . म्हणजे आपले केज शहर व तालुका सुरक्षित राहण्यासाठी मदत होईल. असे आवाहन महादेव सुर्यवंशी(अध्यक्ष व्यापारी महासंघ) केज, सुहास चिद्रवार ( सचिव) व हनुमंत भोसले सर ( सामाजिक कार्यकर्ते) केज यांनी केले आहे.
close