मुरूड । प्रतिनिधी ( विकास मेहेतर ):
आतापर्यंत नागरिकांना, कोविड चाचणी साठी जिल्हा रुग्णालय - अलिबाग हा एकमेव आणि खात्रीदायक विकल्प होता.
मात्र येत्या सोमवार पासून, अलिबाग मधील ज्येष्ठ नागरिक हॉल येथे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने ( ICMR) मान्यता दिलेल्या मिलेनियम लॅब्स प्रायव्हेट लिमिटेड- ठाणे आणि पनवेल मधील एर्रोहेड सर्विसेस यांच्या संयुक्त माध्यमाने, कोविड-चाचणी बूथ उभारण्यात आला आहे. सकाळी 10:30 वाजल्यापासून ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत कार्यरत राहणाऱ्या या बूथ मध्ये अद्यावत RT-PCR ही स्वाब टेस्ट चाचणी सरकार ने निर्धारित केलेल्या दरात म्हणजे केवळ रुपये 2500/- मध्ये होणार असून, याच बूथ मध्ये कोविड अँटिजेन चाचणी तसेच कोविड अँटीबॉडी चाचणी केली जाणार आहे.
RT- PCRचाचणी चा रेपोर्ट 24-36 तासात मिळणार असून, कोविड रॅपिड अँटिजेन चा रेपोर्ट अर्ध्या तासाच्या आत मिळणार असून, कोविड निदान करण्यासाठी आता अलिबागकरांना मोठी उपलब्धि प्राप्त होणार आहे.
जिल्हा रुग्णालय मान्यता प्राप्त एर्रोहेड सर्विसेस प्रयोगशाळेने , कोविड अँटिजेन टेस्ट केवळ रुपये 750/- करून रुग्णांना चाचणी निकाल अहवाल अवघ्या 30 मिनिटत देणाचे आश्वासित केल्याने, लक्षणं असलेल्या रुग्णांना झटकेपट निकाल मिळण्यास शक्य होणार आहे.
तसेच आपल्याल्या "कोविड आजार होऊन गेला आहे का" किंवा आपल्या शरीरात "कोविड विरुद्ध रोग प्रतिकार शक्ती तयार झाली आहे" की नाही, ही उत्तरे देणारी - "कोविड अँटीबॉडी" चाचणी ह्या बूथ मध्ये केवळ रुपये 500/- मध्ये करण्यात येणार असून, त्याचा निकाल नागरिकांना दुसऱ्या दिवशी मिळणार आहे.
थोडकयात, "या बूथ वर आता कोविड संबंधित सर्व चाचण्या" नागरिकांना उपलब्ध होणार असून, नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा.
ह्या बूथ चे उदघाटन.समारंभ , सोमवारी दिनांक 10.08.2020 रोजी सकाळी दहा वाजता, अलिबाग शहराच्या च्या माननीय उपनगरअध्यक्ष सौं मानसी म्हात्रे यांच्या कडून करण्यात येणार असून, या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून, रायगड जिल्हाधिकारी सन्मानीय सौं निधी चौधरी तसेच या कार्यक्रमाच्या अतिथी म्हणून जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.माने*अलिबाग नगरपालिका चे मुख्य अधिकारी श्री महेश चौधरी, श्री प्रदीप नाईक, आडव्होकेट श्री गौतम पाटील व श्री अजय झुंजाराव उपस्थित राहणार आहेत.


