हिंगोली । प्रतिनीधी(विश्वनाथ देशमुख)➤ 
दि.२७,हिंगोली जिल्ह्यातील औंढा - वसमत रोडवर काठोडा  गावानजीक असलेल्या रोडवर अज्ञात वाहनाने मोटरसायकलला धडक दिली असता त्यामध्ये एक ठार तर दोघे जखमी झाल्याची घटना आज दि.२७ ऑगस्ट गुरुवार रोजी दुपारी एक वाजता घडली.




सदरील  मोटरसायकल अपघातामध्ये सचिन गौतम मुळे वय 20 वर्ष राहणार औंढा नागनाथ हा जागीच ठार झाला तर मयूर चंद्रकांत मुळे व सुंदर भानुदास मुळे हे दोघे रा.औंढा नागनाथ जखमी झाले .यावेळी जखमींना औंढा नागनाथ येथील नगरसेवक शंकर शेळके यांनी मदतीचा हात दिला व औंढा नागनाथ ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केले. सदरील मयत सचीन मुळे यांचा पंचनामा  शिरड शहापूर चौकीतील पोलीस करत आहेत व जखमींना औंढा नागनाथ येथील रुग्णालयांमध्ये दाखल करून त्यांच्यावर उपचार प्रक्रिया सुरू होती मोटरसायकल वरील युवक हे शिरड शहापूर करून औंढा नागनाथ कडे येत असताना अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली त्या धडकेमध्ये  एक ठार  तर दोन जण जखमी झाले . सदरील मोटरसायकल नंबर नाही.या  युवकाच्या जाण्याने औंढा नागनाथ शहरांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.