shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

विडा गावाजवळील वळण रसत्यावर गतिरोधक बसवा..!!

जि.प.सदस्य विजयकांत मुंडेंचे कार्यकारी अभियंत्यांना पञ ....!! 


केज तालुका । प्रतिनिधी ( प्रकाश मुंडे) ➤
विडा येथून जाणारा राज्य मार्ग २२२ वर विडा गावाजवळील वळणरसत्यावर गतिरोधक बसवण्या बाबत विडा गटाचे लोकप्रिय जिल्हा परिषद सदस्य विजयकांत मुंडे यांनी कार्यकारी अभियंत्यांना पञ दिले आहे.





राज्य मार्ग २२२ विडा ता.केज येथिल वळणरसत्यावर गतिरोधक करण्यात आलेले नाहीत विडा हे गाव बारा वाड्यांचे मध्यवर्ती ठीकाण असून या ठीकाणी वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते.मागील आठवड्यात याच रस्त्यावर अपघात होऊन दोन युवकांना आपला प्राण गमवावा लागला आहे.त्यामुळे यापूढे अशा प्रकारचे होणारे अपघात रोखण्यासाठी विडा गावाजवळील सह वळणरसत्यावर गतिरोधक बसविण्याची आत्यंत गरज असल्याचे त्यांनी कार्यकारी अभियंता आंबेजोगाई यांना दिलेल्या पञात म्हटले आहे.
close