विविधतेतून एकता असलेला भारत देशाचे दर्शन ..!!
खर्डा । प्रतिनिधी (अनिल धोत्रे)
हिंदू-मुस्लीम ऐक्याच्या अनेक घटना आणि प्रसंग आजूबाजूला घडताना आपण पाहतो मग एखादा संकट असो की सणवार विविधतेने नटलेल्या परंपरेच दर्शन आपल्याला घडताना दिसून येते असाच एक प्रसंग जामखेड तालुक्यातील खर्डा या ठिकाणी पहावयास मिळत आहे .
खर्डा येथील हत्तीमहाल या ठिकाणी सर्व धर्म समभावाच्या जाणीवेतुन मुस्लिम समाज्याच्या काही लहान मुलींनी सार्वजनिक श्री गणेश उत्सवाची घरगुती स्थापना करण्यात आली आहे. सरपंच संजय गोपाळघरे यांच्या हस्ते आरतीही करण्यात आली.
कोरोना या संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून शहरात सार्वजनिक गणेश मंडळानी यावर्षी सार्वजनिक गणेशत्सव साजरा न करण्याचा एकत्रित निर्णय घेतला. परंतु शहरातील फिरोज मापाडी मुस्लिम कुटुंबातील लहान मुलांनी घरीच गणपती स्थापना केली. शेजारील हिंदू कुटुंबातील लहान मुलं व घरातील मुलांच्या आग्रहामुळे एकत्रित येऊन गणेश स्थापना केली. रोज नित्यनियमाने रांगोळी,प्रसाद, पूजा व आरती लहान मुलं मोठ्या आनंदाने करतात.
या गणेश मंडळात आईशा मापाडी,जिया मापाडी, खुशबू मापाडी, नुजो आत्तार, आलू आत्तार, आवेज आत्तार, फैजल मापाडी, शौर्य काळे,सुलतान मापाडी आदि लहान मुलं सहभागी झाले. इडा पीडा टळो, कोरोना या महाभयंकर आजाराचे सावट गावावरून, देशावरून, जगांवरून जावू दे असे लहान मुलांच्या गणपतीला सरपंच संजय गोपाळघरे यांनी साकडे घातले.!!


