तर तिचे साथीदार पळून गेले...
गडचिरोली :- एटापल्ली तालुक्यातील जारावंडी पोलीस ठाण्यांतर्गत दोलंदा जंगलात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये बुधवारी (दि.२६) दुपारी चकमक उडाली या चकमकीत एक महिला नक्षलवादी ठार झाली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून ओळख अद्याप पटलेली नाही.पोलीस दलाच्या सी-६० पथक नक्षलविरोधी अभियान राबवत होते. दरम्यान दुपारी २ वाजताच्या सुमारास नक्षला सोबत ही चकमक उडाली. पोलिसांचा दबाव वाढल्यानंतर नक्षलवादी जंगलात पळून गेले. त्यानंतर राबवलेल्या शोध मोहिमेत एका महिला नक्षलिचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून तिची ओळख पटविण्याचे काम सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.


