सोनई । प्रतिनिधी :
(मोहन शेगर )
ढंपर अडविल्याच्या गैरसमजातून यशवंतनगर भागात रहाणार्या तरुणासह दोघा अनोळखींनी कार मध्ये घालून अपहरण केले. गावठी कट्टा, गिरणीचा पट्टा व लाकडी दांड्याने मारहाण करुन दात पाडले अशी तक्रार सोनई-शिंगणापूर रस्त्यावर राहणार्या हॉटेल व्यवसायिकांचे दिल्याने सोनई पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध अपहरण व मारहाणीचा गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत समजलेली सविस्तर माहिती अशी की, अहमदनगर येथील एका खाजगी रुग्णालयामध्ये औषधोपचार घेत असलेल्या संतोष पोपट बारहाते (वय ४१) याने दिलेल्या जबाबात म्हटले की, २४ जुलै रोजी खेडले परमानंद रोडवर असणार्या एका दवाखान्यासमोरे फोनवर बोलत उभा असताना सोनई गावातून पांढर्या रंगाची स्विफ्ट डिझायर कार मधून तिघे आले. ड्रायव्हर सीटवरुन राहुल पद्माकर दरंदले हा तरुण माझ्याकडे आला व माझ्याडोक्याला गावठी कट्टा लावून गाडीत बस असे म्हणाला, मी घाबरुन गाडीत बसलो गाडीत अन्य गदोघेजण होते. मला गाडीतून वळण (ता-राहुरी) येथे घेऊन गेले.कार मुसळवाडी रोडने नेल्यानंतर राहुलने गावठी कट्टा तोंडावर मारुन दात पाडले तसेच अनोळखी दोघाजनांनी फायटने मारले.गाडी खाली घेऊन माझे डोक्यत, डोळ्यावर, तोंडावर, कंबर छाती मांडीवर मारहाण केली.
रात्री २ वाजता माझे घरा समोर आणून टाकले हातातील घड्याळ व खिशातील ३० हजार रुपये त्यांनी काढून घेतले असावेत या जबाबावरून सोनई पोलीस ठाण्यात आरोपी राहुल पद्माकर दरंदले ,रा.यशवंतनगर, सोनई, व त्याचेदोन अनोळखी साथीदार यांच्या विरोधात भा.द.वि. कलम ३२६,३२९,३६५,३२४,३२३,५०४,५०६,३४ व आर्मअॅक्ट ३ व २५ प्रमाणे २७२/२०२० क्रमांकाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक निरीक्षक ज्ञानेश्वर थोरात हवालदार प्रवीणआव्हाड पुढील तपासकरीत आहेत.
सोनई मध्ये अवैध सावकारकीने व दिवसा ढवळ्या वाळू तस्करनिनी धुमाकुळ घातला असुन अव्वाच्या सवा रक्कम सावकाराकडून वसुल करण्यात येते. या सावकारकीच्या सोनई आणि शिंगणापुर परिसरात टोळ्या कार्यरत आहेत. आठवड्याला दुप्पट रक्कम वसुल केली जाते त्यातून काही जणांनी आत्महत्याही केल्या आहेत, त्या मुळे पोलीस प्रशासनाला अवैध सावकारकी विरोधात तीव्र मोहीम हाती घेण्यात यावी अशी जनतेतून मागणी होत आहे.

