shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

ब्रह्मदेव ला नाही दोन्ही हात, जिद्दीने करतोय परिस्थिती वर मात..!!

लातूर - वडार समाजातील कुटुंबात जन्म घेतलेला व आर्थिक परिस्थिती बेताची असलेल्या लष्करे कुटुंबातील ब्रह्मदेव लष्करे ज्याला दोन्ही हात नाहीत या परिस्थितीत ही शिक्षणाच्या प्रवाहात स्वतःला जिद्दीने वाहून घेत त्याने दहावीच्या परीक्षेत ६७% गुण मिळवीत प्रतिकूल परिस्थितीत भरघोस यश मिळवीत कौतुकास्पद कामगिरी केली आहे.
लष्करे कुटुंब लातूर शहरातील सिकंदरपूर च्या वडार वस्तीत राहतात. ब्रह्मदेव ची आई रामकाबाई, वडील सुरेश हे दोघेही मिळेल ते मौलमजुरी ची काम करतात. आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची, त्यात ब्रह्मदेव दोन्ही हातानी अपंग तर तो शाळा कस शिकणार हा प्रश्न लष्करे कुटुंबासमोर होता, पण जिद्दीने पदस्पर्शाच्या लेखणीने ब्रह्मदेव शिक्षण घेत आहे व दहावीला प्रथमश्रेणी सह ६७% गुण मिळवीत पास झाला आहे.

आता सामाजिक कार्यकर्ते, सेवाभावी संस्था यांनी ब्रह्मदेव लष्करे च्या पुढील शिक्षणासाठी सरसावले पाहिजे.

- सचिन चव्हाण औरंगाबाद
close