कर्जत : वडार समाजाचे पुलकेशी, बंगलोर (कर्नाटक) येथील कॉंग्रेसचे विद्यमान आमदार अखंड श्रीनिवासमुर्ती यांच्या निवास स्थानी दि. 4/8/2020 रोजी सोशल मिडिया वरील पोस्ट चे निमित्त करून काही समाज कंठकांनी जिवितहानी करण्याच्या उद्देशाने हल्ला करून वाहनासह अनेक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान करून त्यांचे निवास स्थान पेटवून दिले या निंदनीय कृत्याचा महाराष्ट्रातील वडार समाजाच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करत आहोत.
मा. आमदार अखंड श्रीनिवास मुर्ती यांच्यावर देशद्रोही प्रवृत्ती च्या लोकांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा धिक्कार करून त्यांच्यावर ओढवलेल्या निंदनीय प्रसंगात त्यांच्या बरोबर महाराष्ट्रातील वडार समाजा बरोबरच देशातील वडार समाज उभा आहे व राहील. शांती, अहिंसा मार्गाचा इतिहास असणारा वडार समाजाने देशात सदैव शांतीसाठी सदैव प्रयत्न केला आहे.
कर्नाटक सरकारने या संदर्भात ठोस व कठोर पाऊले उचलून अश्या प्रवृत्तींना जागेवरच नेस्तनाबूत करावे अन्यथा येणार्या कालावधीत संपूर्ण देशातील वडार समाज रस्त्यावर उतरून या घटने विरुद्ध तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल. असे वडार /ओड कम्युनिटी कौन्सिल ऑफ इंडिया महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस गोविंद तांदळे यांनी कर्जत तहसीलदार यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.
या निवेदनावर अमोल तांदळे, आजिनाथ तांदळे, नितीन जाधव, जानू विटकर, गणेश गुंजाळ, चंद्रकांत तांदळे, श्रीकांत तांदळे, सतिश तांदळे, संजय लष्कर, नितीन अलकूंठे आदी मान्यवर उपस्थित होते.

