प्रतिनिधी । राजेश बाष्टे :
रोहा ; कोकणातील सर्वात महत्त्वाचा समजला जाणारा गणेशोत्सव सण हा गावोगावी घरोघरी तसेच सार्वजनिक पद्धतीने मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.
खारी – चणेरा विभागात शनिवार २२ ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थीला घरोघरी स्थापना करण्यात आलेल्या विघ्हर्त्या गणराज गणरायांचे गौरी माते सह आज सहाव्या दिवशी मोठ्या उत्साहात विसर्जन करण्यात आले. गणेश चतुर्थीच्या दिवशी मोठ्या भक्तीमय वातावरणात घरोघरी आगमन झालेल्या गौरी – गणरायांचे आज मोठ्या जल्लोषात व भक्तीमय वातावरणात साधेपणाने प्रशासनाच्या प्रचलित नियम व अटींचे पालन करून विसर्जन करण्यात आले.
जगभर थैमान घालत असलेल्या कोरोना महामारीची तमा न बाळगता गणपती बाप्पा मोरया,पुढच्या वर्षी लवकर या अशाप्रकारचा जयघोष करीत खारी – चणेरा विभागातील तमाम गणेश भक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पां,गौरी माते ला भावपुर्वक भक्तीमय वातावरणात निरोप दगणेश चतुर्थीच्या मोठ्या आनंददायी वातावरणात गणरायाची घरोघरी स्थापना केल्यानंतर दररोज विधिवत पूजा,अर्चा धार्मिक तथा अध्यात्मिक कार्यक्रम साधेपणाने संपन्न करण्यात आले.

