दिनांक 9 ऑगस्ट
देहरे । प्रतिनिधी : दि.9/08/2020 रोजी देहरे ग्राम स्वच्छता अभियान अंतर्गत देहरे गावात देहरे सैनिक ॲकॅडमीच्या माध्यमातून श्रमदान व स्वच्छता मोहीम राबविण्यात आले.
गावात ज्या ज्या ठिकाणी वाढलेले गवत व कचरा झालेला होता ते स्वच्छ करण्यात आले. यावेळी देहरे गावचे सरपंच किसन धनवटे , ग्रामविकास अधिकारी जाधव मॅडम,साळवे साहेब,मेजर संतोष काळे, देहरे सैनिक Acedemy ,देहरे सर्व कमांडो ,ग्रामपंचायत सर्व कर्मचारी, उपसरपंच अनिल करंडे , चेअरमन डावरे ,चेअरमन ज्ञानेश्वर लांडगे हे सर्व उपस्थित होते.गावातील समाजहित व माणुसकी जपत देहरे येथील सैनिक acedemy वर्षभर सामाजिक उपक्रमात भाग घेत असते .या यांच्या चांगल्या व निस्वार्थी कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

