shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

श्रीमत भागवत कथा संपन्न..!!

राहुरी । प्रतिनिधी :
हिंदू रक्षक धर्म परिषद या धार्मिक व सामाजिक संघटनेचा प्रथम वर्धापनदिन सोहळा निमित्ताने राहुरी तालुक्यातील मानोरी जाधव वस्ती येथे भव्यदिव्य श्रीमत भागवत कथेचे आयोजन दि.२४/८/२०२० ते दि. ३०/८/२०२० रोजी करण्यात आले होते.हिंदू रक्षक धर्म परिषद महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष भागवताचार्य ह भ प किशोरजी महाराज जाधव यांच्या सुमधुर वाणीतून भागवतकथा सोहळा पार पडला.
गेल्या सात दिवसात या भागवत कथे मध्ये भगवान श्रीकृष्ण, श्रीरामप्रभु, संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, श्री छत्रपती शिवाजी महाराज, नंदराजा, देवकीमैया, योशोदामैया, राधाराणी याच्या रासलिला पाहवयास व आयकवयास मिळाल्याने या कथेत भाविक भक्त तलीन झाले होते. गेली सात दिवसात हिंदू रक्षक धर्म परिषद या धार्मिक व सामाजिक संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष श्री.दत्ता पाटील गागरे, त्यांच्या धर्मपत्नी सौ.ज्योतीताई गागरे,राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री.महादेवजी गायकवाड, राहुरी तालुका संपर्क प्रमुख हभप.दिलीप महाराज खळदकर, मातृशक्तीरणरागिणी नगर जिल्हा अध्यक्षा हभप.ज्योतीताई बोरूडे, नवदुर्गारणरागिणी नगर जिल्हा अध्यक्षा साध्वी मुक्तादिदी सोलाट, बजरंगशक्ती सेना राहुरी तालुका अध्यक्ष हभप.गणेश महाराज सजगुरे,  उपाध्यक्ष श्री.भगवानजी नाईकवाडे, राहुरी तालुका प्रसिध्दी प्रमुख पत्रकार श्री.राजेंद्र आढाव, श्री.प्रभाकर नाईकवाडे,महाराष्ट्र प्रदेश सचिव श्री.संजय वाणी, संदिप महाराज पिले दत्तात्रय बेलकर, पांडुरंग आढाव, पांडुरंग विधाटे, दत्तू नाना जाधव, सुनील जाधव, ऋषिकेश जाधव, आण्णा पा साळुंके, भाऊसाहेब साळुंके, मुरलीधर साळुंके, प्रदीप जाधव, जयंत जाधव, गणेश साळुंके, अशोक कणसे, डॉ बाबासाहेब आढाव, संभुगिरी महाराज गोसावी, धनवटे महाराज, पोळ महाराज, श्रीकांत जाधव, आदिनाथ लोखंडे, प्रभाकर कुमकर, सुभाष चोथे*  संघटनेचे अनेक पदाधिकारी व परिसरातील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
close