इंदापूर प्रतिनीधी (तात्याराम पवार)
दि.१७ , इंदापूर कोविड  सेंटर मधील रुग्णांना पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी इंदापूर तालुका यांच्यावतीने फळे वाटप करण्यात आली.

भारताचे पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांच्या अभिष्टचिंतन दिनानिमित्त इंदापूर येथील कोविड सेंटर येथे रुग्णांना फळे वाटप करत असताना भाजपा पदाधिकारी व इतर मान्यवर


यावेळी इंदापुर तालुका अध्यक्ष  अॅड.शरद जामदार म्हणाले की,पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी इंदापुर तालुका यांच्यावतीने राज्याचे माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार कोविड  सेन्टर इंदापूर येथे फळवाटप करण्यात आली. 
 
भारतीय जनता पार्टी नेहमीच गरजू सोबत खंबीर पाठीशी उभे राहिली आहे. ज्यावेळी देशाला ,राज्याला ,परिणामी सर्वसामान्य माणसाला गरज पडेल तेव्हा भारतीय जनता पार्टी नेहमी सोबत आहे .आणि हाच वसा व वारसा आदरणीय मोदी साहेब यांनी घालून दिलेला आहे.

त्यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन आम्ही कार्य करीत आहोत. यावेळी या कार्यक्रमास  शहराध्यक्ष शकिलभाई सय्यद,भरतशेठ शहा, महेंद्र रेडके, अॅड. असिफ बागवान, प्रशांत उंबरे, इम्रानभाई जमादार,सुजित गायकवाड व युवा कार्यकर्ते मान्यवर उपस्थित होते.
----------