हिंगोली/प्रतिनीधी(विश्वनाथ देशमुख)
दि.१७,भारताचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेनगांव तालुका भाजपा च्या वतीने भाजपा कार्यालया समोर वृक्षारोपण करून वाढदिवस साजरा करण्यात आला.
भारताचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आज दि.१७ सप्टेंबर गुरुवार रोजी सेनगांव शहरातील तहसिल कार्यालया जवळील भाजपा संपर्क कार्यालय परीसरात भाजपाच्या वतीने वृक्षारोपण करीत वाढदिवस साजरा करण्यात आला.यावेळी भाजपा किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष दिनकरराव देशमुख,भाजपाचे जेष्ठ नेते तथा उप नगराध्यक्ष आप्पासाहेब देशमुख,तालुकाध्यक्ष अशोक ठेंगल,कृ.ऊ.बाजार समितीचे माजी सभापती शंकरराव बोरूडे,जिल्हा उपाध्यक्ष सुर्यभान ढेंगळे,भाजपा किसान मोर्चा तालुकाध्यक्ष पंडीत तिडके,जिल्हा संघटक हिमत राठोड,तालुका सरचिटणीस श्रीरंग राठोड,विजय धाकतोडे,तालुका उपाध्यक्ष गणेशराव जिरे,शहराध्यक्ष साहेबराव तिडके,नगरसेवक अजय विटकरे आदीसह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

