*महादेव मंदिरासह,दत्त मंदिरात ठेवल्या शैक्षणिक पेट्या..
लोहा । प्रतिनिधी : कोरोना संक्रमण काळात विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लांडगेवाडी येथील मुख्याध्यापक यांच्या पुढाकाराने गावातील विविध मंदिरात शैक्षणिक पेट्या ठेऊन "भक्ती मंदिराकडून ज्ञान मंदिराकडे"या उपक्रमाची आज सुरुवात करण्यात आली.
आँनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून शेवटच्या स्तरावरील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण पोहचिवण्यासाठी शासन दरबारी मोठे पाऊले उचलली जात आहेत, याचेच उदाहरण म्हणजे नांदेड जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी(प्रा.)प्रशांत डिग्रसकर , डाएट चे प्राचार्य डॉ. रविंद्र अंबेकर , अधिव्याख्याता चंद्रकांत धुमाळे , लोहा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी रविंद्र सोनटक्के , यांच्या मार्गदर्शनातंर्गत लोहा तालुक्यातील सर्व विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण विकासासाठी मोठे प्रयत्न चालू आहेत.
ज्या विद्यार्थ्यांजवळ अँड्रॉइड मोबाईल आहेत, ते विद्यार्थी आँनलाईन शिक्षणात सहभागी होत आहेत, परंतु ज्या विद्यार्थ्यांना मोबाईल नाही, अशा विद्यार्थ्यांनाही शिक्षणा पासून वंचित ठेवले गेले नाही पाहिजे, यासाठी "शिक्षक मित्र"नावाचा उपक्रम जिल्हा स्तरावरून राबविण्यात येत आहे,या उपक्रमात ही लांडगेवाडी येथील शिक्षणप्रेमी, पदाधिकारी, माजी विद्यार्थी यांनी स्वेच्छेने भाग घेतला आहे.
कोरोना संक्रमणाचा वाढता वेग लक्षात घेऊन,शिक्षक-विद्यार्थी-गावकरी यांच्या आरोग्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांनी मंदिरात बसून केलेला अभ्यास कागदावर लिहून, तो शैक्षणिक पेटी मध्ये टाकून शिक्षकांना तपासण्यासाठी देतील, व शिक्षकांमार्फत तपासलेल्या अभ्यासा संदर्भात योग्य त्या सूचना दिल्या जातील,तसेच शिक्षक मित्रांच्या मदतीने विद्यार्थ्यांना अवांतर पुस्तके ही वाचण्यासाठी उपलब्ध करून दिली जाणार असल्याचेही यावेळी बोलताना शाळेचे मुख्याध्यापक मंगल सोनकांबळे यांनी सांगितले.
आजच्या या उपक्रम उद्घाटनप्रसंगी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजीव मुलगे,उपाध्यक्ष शिवहार टोपारे, सरपंच प्रतिनिधी तथा मा.शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष नरेंद्र बल्लोरे, ग्रा.प.सदस्य रविशंकर मुलगे, मा.सरपंच विश्वनाथ लांडगे, नागोराव लांडगे,ग्रामसेवक राम चिवडे शिवाभाऊ लांडगे,शिवमूर्ती सोलापूरे, संगमेश्वर टोपारे, अंगणवाडी ताई वनमाला बल्लोरे, आशाताई छाया बल्लोरे, सहशिक्षक केरबा मद्देवाड, राजकुमार गुट्टे, शोभा मुंढे,ग्रा.प.कर्मचारी मन्मथ स्वामी आदी उपस्थित होते.

