सावळीविहीर(प्रतिनिधी):
शिर्डी नगरपंचायतीच्या बीव्हीजी कंपनीच्या स्वच्छता ठेकेदारांचा पगार गेल्या मे महिन्यापासून शिर्डी नगरपंचायतीने न केल्यामुळे या न.प.स्वच्छता ठेकेदारी कर्मचाऱ्यांनी आज गुरुवारी शिर्डी नगरपंचायती समोर काम बंद करून धरणे आंदोलन केले. व शिर्डी नगरपंचायतच्या अधिकाऱ्यांना त्वरित पगार करण्यासाठी निवेदन देण्यात आले.
शिर्डी हे श्री साईबाबा मुळे अांतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र झालेले आहे .अशा जागतिक कीर्तीच्या तीर्थक्षेत्राच्या शिर्डी शहरात स्वच्छतेचे काम शिर्डी नगर पंचायतीने बीव्हीजी कंपनीला देण्यात आले आहे.मात्र शिर्डी नगरपंचायतीने या बीव्हीजी कंपनीला पैसे न दिल्याने बीव्हीजी कंपनीने आपल्या स्वच्छता ठेकेदारी कामगारांनाही गेल्या चार महिन्यापासून पगार दिलेला नाही. कोरोणाच्या ऐन आर्थिक संकटात आपला जीव धोक्यात घालून हे स्वच्छता ठेकेदारी कर्मचारी अहोरात्र काम करत आहेत. मात्र त्यांना या काळात पगार दिला गेला नसल्यामुळे त्यांची मोठी उपासमार होत आहे.
त्यांचे संपूर्ण कुटुंब आज पगार न मिळाल्यामुळे मोठे हालाखित जीवन जगत आहे.त्यामुळे या न.पं. स्वच्छता ठेकेदारी कामगारांनी आज शिर्डी नगरपंचायत समोर काम बंद करून ठिय्या आंदोलन केले व आम्हांला गेल्या मे महिन्यापासून शिर्डी नगरपंचायतीने पगार दिलेला नाही, तो पगार आम्हांला त्वरित मिळावा, असे निवेदनही या स्वच्छता ठेकेदारी कामगारांनी शिर्डी नगरपंचायतच्या प्रशासनाला, अधिकाऱ्यांना दिले आहे.अन्यथा यापुढे आम्ही काम बंद आंदोलन कायमस्वरूपी केल्याशिवाय राहणार नाही.
असा इशाराही देण्यात आला आहे.
यावेळी शिर्डी नगरपंचायतीचे सर्व स्वच्छता ठेकेदारीचे कामगार, महिला कामगार ,मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी शिर्डी शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने या ठेकेदारी कामगारांना पाठिंबा देण्यात आला, यावेळी राष्ट्रवादीचे शिर्डीतील नेते निलेश मुकुंदराव कोते यांनी या आंदोलनाला पाठिंबा देत सांगितले की, ज्या स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या जीवावर शिर्डी नगरपंचायतीला 15 कोटीचे स्वच्छतेसाठी बक्षीस मिळते.
त्याच नगरपंचायतीच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना कोरोना काळात चार महिन्याचा पगार नाही. हे दुर्दैवाचे असून शिर्डी नगरपंचायतचे त्वरित या स्वच्छता कर्मचाऱ्यांचा पगार द्यावा .अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस तीव्र आंदोलन छेडले शिवाय राहणार नाही. असा इशाराही त्यांनी यावेळी दिला .

