shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मी स्वता तपासणी केली तुम्ही पण करा...लोहा नगरपालीकेला सहकार्य करा.....“माझे कुटूंब माझी जबाबदारी” अभियानास मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी सुरवात...!!



लोहा । प्रतिनिधी (अशोक सोनकांबळे):
लोहा नगरपरिषदेतर्फे कोरोना आजाराच्‍या वाढता प्रादुर्भाव पाहता दैनंदीन मृत्‍यूदर कमी करण्‍यासाठी शासनाच्‍या महत्‍वकांक्षी अशा “माझे कुटूंब माझी जबाबदारी” या अभियानाअंतर्गत शहरातील वय वर्षे ५० पेक्षा जास्‍त असलेल्‍या व्‍यक्‍तींचे घरोघर जाऊन सखोल आरोग्‍य परिक्षण अभियानास दि. 17 सप्टेंबर पासुन सुरुवात करण्‍यात आलेली आहे.

सदरचा उपक्रम मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून माझे कुटुंब माझी जबाबदारी या अभियानास .स्वता लोकनियुक्त नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी यांनी स्वथा तापासुन सुरवात केली.व नगरसेवक नगरपालीकेचे कर्मचारी यांची तपासणी करून घेतली.

या कामासाठी  आरोग्‍य विभाग, नगरपरिषद व स्‍वयंसेवक यांच्‍या माध्‍यमातून दि. 17 सप्टेंबर पासून सुरु करण्‍यात आलेली असून यात वय वर्षे ५० वरील व्‍यक्‍तींचे थर्मल स्‍कॅनींग, प्‍लस ऑक्‍सीमिटरद्वारे तपासणी करुन कोमॉर्बीड (दिर्घ आजाराची माहिती) यात दमा, मधुमेह, उच्‍च रक्‍तदाब, हृदयरोग आदी गंभिर स्‍वरुपाचे आजारांच्‍या नोंदी देखील घेण्‍यात येत असून शासनाच्‍या "माझे कुटूंब, माझी जबाबदारी" या अभियानास नागरीकांकडून जास्तीत जास्त लोकांनी सहभागी होऊन नगरपालीकेला सहकार्य करावे.
असे आवाहन नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी यांनी केले आहे .

जनता कर्फ्यु ला लोकांनी सहकार्य केले तसेच माझे कुटुंब माझी जबाबदारी या अभियानास सहकार्य करावे व आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्यावी.तुम्ही खबरदारी घ्या आम्ही जबाबदारी घेतो आसे नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी यांनी सांगितले आहे.

सदर अभियानाची नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी, मुख्यधिकारी आशोक मोकले व उपाध्यक्ष सर्व सन्माननीय, नगरसेवक , ओ.एस उल्हास राठोड  तसेच नगरपालीकेचे  सर्व कर्मचारी वैद्यकीय कर्मचारी संतोष इंगळे ऐस डी वडवळे आशा स्‍वयंसेविका ज्योती वाघमारे गंगासागर गंजलवाड नगरपालीकेचे चार कर्मचारी यांची या कामासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. आसे ओ.ऐस ऊलास राठोड यांनी सांगितले.
close