सावळीविहीर (प्रतिनिधी) :
मराठा समाजाला आरक्षण मिळावे. त्यासाठीआपण नेतृत्व करावे आणि यासाठी भारताचे पंतप्रधान मा,नरेंद्र मोदी यांच्या समवेत महाराष्ट्रातील सर्व खासदारांची बैठकीचे नियोजनासाठी आपण पुढाकार घ्यावा. असे सांगत मराठा आरक्षणाला जाहीर पाठिंबा देणारे पत्र शिर्डीचे लोकसभा खासदार सदाशिव लोखंडे यांनी राज्यसभेवरील खासदार असणारे युवराज छत्रपती संभाजीराजे भोसले यांना दिले आहे.
खासदार संभाजीराजे भोसले यांना पाठवलेल्या या पत्रात खासदार सदाशिव लोखंडे यांनी म्हटले आहे की, मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून सर्व जाती-धर्माचे लोक एकत्र लढा देत होते व महाराष्ट्र शासनाने ही मराठा समाजाला आरक्षण दिले होते.त्यामुळे मराठा समाजातील गरीब, तरुण वर्गाला मोठा त्याचा फायदा झाला होता .मात्र सर्वोच्च न्यायालयाने हे आरक्षण स्थगित केले असल्यामुळे आता मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून विविध संघटना पुढे येत आहेत.
या निर्णयाला विरोध करत आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून माझाही जाहीर पाठिंबा आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आपण नेतृत्व करावे व महाराष्ट्रातील सर्व खासदारांची यासंदर्भात भारताचे पंतप्रधान मा, नरेंद्र मोदी यांच्याशी यांच्याबरोबर बैठकीचे नियोजन आपण करावे. अशी मागणी शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी या पत्रात म्हटले आहे. व मराठा आरक्षणासाठी मी आपणा बरोबर असून त्यांनी जाहीर पाठिंबा या पत्रातून दिला आहे.

