बीड / जिल्हा प्रतिनिधी ( प्रकाश मुंडे ):-
मराठवाड्यातील दुसरे मोठे धरण म्हणून ओळख असलेल्या माजलगाव धरणामुळे खऱ्या अर्थाने हरितक्रांती होऊन तीन जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान उंचावले असून गेल्या दहा वर्षात माजलगाव धरण हे तीन वेळा भरले असून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे,बीड,माजलगाव शहर आणि ११ पुनर्वसित गावाचा पिण्याचा आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघाला आहे.तर परळी येथील औष्णिक विद्युत केंद्राला देखील जलाशय भरल्याने संजीवनी प्राप्त झाली आहे.
माजलगाव तालुक्यात खेड्याची संख्या ही १२१ असून तालुक्याची लोकसंख्या २ लाख २५ हजार ८१७ आहे तर तालुक्याचे क्षेत्रफळ ९० हजार हेक्टर आहे तालुक्याचे सरासरी पर्जन्यमान हे ८०१.०० मि.मी आहे जूनच्या पर्जन्यानंतर काही प्रमाणात पर्जन्यमान कमी होते परंतु यंदा वरून राजाने चांगली कृपादृष्टी केल्याने सप्टेंबरच्या अर्ध्यातच माजलगाव धरण हे भरले असून यामुळे माजलगाव शहर त्याचबरोबर ११ पुनर्वसित गावे याठिकाणचा पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघाला असून परळी येथील औष्णिक विद्युत केंद्र त्याचबरोबर परभणी,नांदेड आणि बीड या तीन जिल्ह्याला या जलाशयाच्या पूर्णत्वाने संजीवनी मिळाली आहे.गोदावरी सिंधफना नदीवर बांधण्यात आले असलेले बॅरेंगेज आणि उच्चपातळी बंधाऱ्यामुळे नदीकाठच्या गावांत हरित क्रांती झाली असून कोरडवाहू वरून तालुका ग्रीनबेल्ट झाला आहे.
तालुक्यातील बंधारे,धरण हे ओव्हरफुल झाल्याने शेतकरी वर्ग बागायतदार होण्यास मदत झाली असून दोन वर्षे पूर्वी कमी झालेली पाणी पातळी यंदा वाढल्याने नगदी पीक म्हणून ओळख असलेल्या उसाच्या लागवडीत देखील वाढ झाली आहे.पाण्याच्या उपलब्धतेमुळे शेतकरी वर्गाच्या आर्थिक परिस्थिती उंचावण्यास नक्कीच फायदा होणार आहे. माजलगाव धरण हे मराठवाड्यातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे धरण आहे या धरणांमुळे खऱ्या अर्थाने हरित क्रांती झाली असून ६० किलोमीटर अंतरावरील बीड शहराचा देखील यातून पाणी प्रश्न निकाली निघाला आहे.परळी येथील औष्णिक विद्युत केंद्राला पाणी पुरवठा याच धरणातून होत होत असून बीड जिल्ह्यातील ३० हजार हेक्टर जमीन ओळीतखाली येत असल्याने त्याचा फायदा निश्चित शेतकऱ्यांना होणार आहे.थोडक्यात माजलगावचे हे धरण आज पूर्ण क्षमतेने भरल्याने तीन जिल्ह्याला संजीवनी ठरणार असून काही काळ पाण्याचा प्रश्न निकाली निघाला आहे.सध्या माजलगाव धरण हे ९८ टक्के भरले असल्याने धरणाचे ३ दरवाजे उघडण्यात आले असून त्यातून नदी पात्रात विसर्ग करण्यात येत आहे.गेल्या दहा वर्षात हे धरण तीन वेळा पूर्णतः क्षमतेने भरले असून यातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.
सिंचन वाढल्याने तालुक्याचा झाला ग्रीनबेल्ट
सिंधफणा नदीवर उच्चपातळी बंधारे ,बॅरेंगेज झाल्याने ८ हजार ५९० हेक्टर जमीन सिंचनाखाली आली आहे सध्या हे सर्व बंधारे भरलेले असून त्यात आवक सुरू आहे.त्याचबरोबर लोणी सांगवीच्या उपसा योजनेमुळे पाणी साठवणूक होऊन हरित क्रांती घडली आहे.
दृष्टीक्षेपात माजलगाव धरण
● धरणासाठी संपादित जमीन - ७ हजार ८१३ हेक्टर
● पाणलोट क्षेत्र - ३ हजार ८४० चौ.कि.मि
● पाणीसाठवन क्षमता - ४५४ द.ल.घ.मी
● धरणाची पात्रातील उंची - ३१ मि.
● धरणाची लांबी - ६ हजार ४८८ मि.
● दरवाजे संख्या - १६(उंची ८, रुंदी १२ मि)
● पाण्याची टक्केवारी - ९८.७२ टक्के
१४८ कि.मीचा उजवा कालवा ठरतोय दुवा
● तीन जिल्ह्यातील सिंचन क्षेत्र - ८४ हजार ८५० हेक्टर
● बीड - ३० हजार १०५
● परभणी - ४४ हजार ४०८ हेक्टर
● नांदेड - १० हजार ३३७ हेक्टर.
**** माजलगाव धरण पूर्ण शमतेने भरल्या मुळे वरील भागातील पाण्याचे सर्व प्रश्र्न मिटले आहेत या करीता या भागाचे लोकप्रिय नेते रमेश आडसकर यांनी आनंद व्यक्त केला आहे. ****

