shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अखिल भारतीय गरीबी निर्मुलन समितीच्या पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष पदी काकासाहेब मांढरे , तर पुणे जिल्हा कार्याध्यक्ष पदी धनंजय कळमकर..!!

इंदापूर प्रतिनिधी (तात्याराम पवार)
इंदापूर येथे अखिल भारतीय गरीबी निर्मुलन समितीच्या पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष पदी पत्रकार काकासाहेब मांढरे यांची व पुणे जिल्हा कार्याध्यक्षपदी पत्रकार धनंजय कळमकर यांची निवड करण्यात आली आहे.
अखिल भारतीय गरीबी निर्मुलन समितीच्या पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष पदी इंदापूर येथील दैनिक जनप्रवास वृत्तपत्राचे इंदापूर तालुका प्रतिनिधी काकासाहेब मांढरे यांची निवड करण्यात आली आहे. तसेच पुणे जिल्हा कार्याध्यक्षपदी शिवसृष्टी साप्ताहिक व चँनल चे संपादक  धनंजय कळमकर यांना निवडीचे पत्र समितीचे संस्थापक , अध्यक्ष लालासाहेब गायकवाड यांनी दिले आहे.


जागतिकीकरणामुळे व आर्थिक सुधारांमुळे देशाचा विकास होत आहे.परंतु असे असले तरी काही मुठभर लोकांनाच याचा फायदा होत असल्याने देशातील गरीब हा आणखी गरीबच होत आहे.

त्यामुळे अश्या लोकांचे जीवनमान शैक्षणिक,सामाजिक व आर्थिक दृष्ट्या सक्षम बनविणार असल्याचे काकासाहेब मांढरे यांनी सांगितले.तसेच समितीच्या माध्यमातून याची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी या उद्देशाने या समितीची स्थापना करण्यात आली आहे. 
समीतीचे संस्थापक अध्यक्ष  लालासाहेब गायकवाड, सल्लागार अँँड .एस. ए .येवते पाटील सिनिअर अँँडव्होकेट नवी दिल्ली हे संस्थेचे प्रमुख पदाधिकारी आहेत. 

या समितीच्या पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष पदी काकासाहेब मांढरे यांची निवड करण्यात आली आहे.पत्रकार मांढरे यांना शालेय जीवनापासून सामाजिक कार्याची आवड आहे.स्वतः गरिबीचे चटके सोसलेल्या काकासाहेबांनी कॉलेज जीवनात ग्रामीण भागात प्रौढ शिक्षण वर्ग घेऊन अनेक प्रौढ व महिलांना साक्षर केले त्याची दखल घेऊन.सन १९८७ साली आकाशवाणी पुणे केंद्राने त्यांची प्रकट मुलाखत घेतली होती .

पंजाब राज्यात खलिस्तान वाद्यांच्या कारवायांमुळे धगधगत असताना पुण्यातील संजय नहार यांच्या वंदे मातरम संघटनेमार्फत त्यांनी १४ दिवस पंजाबमध्ये पायी शांततेसाठी सदभावना यात्रा केली.लातूर भूकंपानंतर सास्तूर या गावी जाऊन तेथील भूकंपग्रस्तांना मदत केली . अनेक अपघातग्रस्तांना मदत करुन अनेकांचे प्राण वाचविले आहेत. गलांडवाडी नं .१ येथील विमान अपघात अनेक वाहन अपघातग्रस्तांना मदत करून प्राण वाचवले मयत पावलेल्याच्या कुटुंबांना मदत मिळवून देण्याचे मोलाचे काम त्यांनी केले आहे.

 काकासाहेब मांढरे यांचा धार्मिक कार्यक्रमातही हिरारीने सहभाग आहे. सांस्कृतिक कार्यातही ते अग्रेसर आहेत. यामाध्यमातून विविध जाती धर्मातील वधुवरांचे मोफत विवाह जुळवणे व पार पाडले आहेत. 

नोकरीचा राजेनामा देऊन अनेक वर्षे फोटोग्राफी व सध्या पत्रकारितेचेही काम करत आहेत स्वतःची टुर्स अँँन्ड ट्रॅव्हल्स स्थापना करून हजारो पर्यटकांना जेष्ठांना नाममात्र शुल्क घेऊन संपुर्ण देशात उत्कृष्ट नियोजन करत धार्मिक व पर्यटनस्थळांची यात्रा घडवून आणल्या आहेत.

इंदापूरात नादब्रह्म संगीत विद्यालयाची स्थापणा करू न अनेक संगीत प्रेमींना गायन , वादन, नृत्य शिकण्याची संधी उपलब्द करून दिली अनेक कलाकरांना शासकीय मदत मिळवून दिली .

सध्या लॉक डाऊनच्या काळात पायी प्रवास करणाऱ्याअनेक गोरगरीब प्रवाशांना नागरीकांना मदत केली .कुस्ती, कबड्डी, हॉलिबॉल मधील गोरगरिब खेळाड्रंना प्रोत्साहन देऊन त्यांना संधी उपलब्द करून दिल्या. मयत असो अथवा दुर्घटना असो किंवा सुखदुःखाच्या वेळी गोरगरीब जनतेच्या सदैव पाठीशी रहाणारेअसे पत्रकार  मांढरे  आहेत तसेच 
साप्ताहिक  शिवसृष्टी चे संपादक म्हणून काम करीत असणारे तसेच शिवसृष्टी वेबपोर्टल ,यूट्यूब चैनल च्या माध्यमातून समाजातील सर्वसामान्यांच्या प्रश्नाला वाचा फोडण्याचे कार्य करणारे कळमकर त्यांचा मनमिळावू स्वभाव हा आदर्श मानला जात असून त्यांच्या सामाजिक शैक्षणिक तसेच विविध कार्याची दखल घेऊन त्यांना पुणे जिल्हा कार्याध्यक्षपदी कार्य करण्याची जबाबदारी समितीचे संस्थापक अध्यक्ष लालासाहेब गायकवाड यांनी दिले आहे.

पत्रकार काकासाहेब मांढरे व धनंजय कळमकर यांच्या निवडीने तालुक्यातील विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन व कौतुक होत असल्याचे दिसत आहे
close