shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिलेला शब्द पूर्ण करावा..!!

कोरोनाने मयत पत्रकाराच्या कुटूंबियांना पन्नास लाखाची हर मदत;आरोग्य विमा उतरावा मराठी पत्रकार परिषदेचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन...!! 

बीड / जिल्हा प्रतिनिधी ( प्रकाश मुंडे):- राज्यात कोरोना आजाराने उग्ररूप धारण केले आहे. सर्वसामान्यांसह माध्यम क्षेत्रात काम करणार्‍या पत्रकारांना पन्नास लाख रूपयांची मदत करावी अशी मागणी मराठी पत्रकार परिषदेने महाराष्ट्रात सर्वात पहिल्यांदा मागणी केली व त्या अनुषंगाने आज राज्यात तालुका पातळीपासून राज्य पातळीपर्यंत आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी पत्रकारांना दिलेला शब्द पूर्ण करावा. पन्नास लाखाची मदत पत्रकारांच्या कुटूंबियांना देण्यात यावी व राज्यातील सर्व पत्रकारांचा विमा काढण्यात यावा अशी मागणी मराठी पत्रकार परिषदेकडून केली गेली आहे.बीड येथे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

   
मराठी पञकार परीषदेच्या वतीने राज्यभरात जिल्हा व तालूका स्तरावर कोरोना संबंधी विवीध मागण्याचे निवेदन देण्यात आले. या निवेदनात आरोग्यमंत्र्यांनी शब्द देऊन बराच कालावधी लोटला आहे.राज्यात आतापर्यंत 25 पेक्षा जास्त पत्रकार कोरोना आजाराने बळी गेला आहे. तर पन्नासपेक्षा जास्त पत्रकार आज कोरोना आजारावर उपचार घेत आहेत. त्यामुळे राज्य शासनाने या गंभीर बाबीची नोंद घेऊन तातडीने केलेली घोषणा पूर्ण करावा आणि राज्यातील पत्रकारांना न्याय द्यावा अशी मागणी निवेदनाव्दारे जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे.

राज्यामध्ये कोरोनाचे संकट अधिक उग्र आणि व्यापक झालेले आहे.अशा संकटात शासनाला,प्रशासनाला व सर्वसामान्यांना वृत्ताच्या माध्यमातून माहिती व्हावी यासाठी पत्रकार रात्रंदिवस काम करत आहेत.या आजाराने पत्रकाराला या आजाराने पछाडले आहे.कोरोना आजारामुळे आतापर्यंत राज्यात 25 पत्रकारांचा बळी गेला आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांना विमा योजनेचे कवच दिले जाईल आणि त्याबाबत पुढील कॅबिनेट बैठकीमध्ये निर्णय घेतला जाईल असे स्पष्ट केले होते.या शब्दाला पंधरा दिवसांपेक्षा जास्त कालावधी लोटला आहे. तरी सुध्दा अद्याप मयत पत्रकारांच्या कुटुंबियांना मदत मिळाली नाही.त्याचबरोबर राज्यात पन्नासपेक्षा जास्त पत्रकार आज कोरोना आजारावर उपचार घेत आहेत.त्यामुळे कोरोनाबाधित पत्रकारांना स्वतंत्र बेडची व्यवस्था करण्याबरोबर ऑक्सीजन व व्हेन्टीलेटर उपलब्ध होईल अशी व्यवस्था करावी.

पत्रकार पांडुरंग रायकर व संतोष पवार यांच्या मृत्यूची चौकशीचे आदेश आरोग्यमंत्री,माहिती जनसंपर्क मंत्री यांनी दिले होते. सदरील चौकशीवर अद्याप कसलेही कारवाई झाली नाही. मृत्यूस जबाबदार असलेल्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा या मागणीसह मयत पत्रकारांच्या कुटूंबियांना पन्नास लाखाची मदत करून विमा उतरावा अशी मागणी  मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्‍वस्त एस.एम.देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी राज्य प्रसिध्दीप्रमुख अनिल महाजन, विभागीय सचिव विशाल साळुंके,जिल्हाध्यक्ष सुभाष चौरे, जिल्हाध्यक्ष साहस आदोडे,कार्याध्यक्ष दत्तात्रय अंबेकर, सरचिटणीस विलास डोळसे,राज्य कार्यकारिणी सदस्य अनिल वाघमारे,सर्वोत्तम गावरस्कर,राजेंद्र होळकर, संजय हंगे  सतीष मुजमुले आदी पत्रकार परिषदेचे सदस्य उपस्थित होते.
close