तहसीलदार व मुख्यमंत्री यांना ईमेल करून प्रत्येकी ५० लाख रुपये मदत करण्याची मागणी..!!
केज / तालुका प्रतिनिधी ( प्रकाश मुंडे):-
आदर्श पत्रकार संघा केज च्या वतीने केजचे नायब तहसीलदार सचिन देशपांडे यांना निवेदन देऊन व मुख्यमंत्री उद्ददव ठाकरे यांनी ई मेल करून कोरोनाने निधन झालेल्या पत्रकारांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५० लाखांची मदत करण्याची मागणी करण्यात आली. व केज मधील विश्रामगृह येथे बैठक घेऊन श्रद्धांजली अर्पण कार्यक्रम घेण्यात आला.या कार्यक्रमात मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांनी देखील दुरध्वनी वरुन श्रद्धांजली अर्पण करुन या बाबतीत चिंता व्यक्त केली.
रायगड चे पत्रकार संतोष पवार यांचे कोरोना ने निधन झाले आहे. माझे ते कौटुंबिक मित्र होते. आणि रायगड जिल्हा पत्रकार संघाचे ते पदाधिकारी होते. तसेच ते मराठी पत्रकार परिषदेचे माजी सरचिटणीही होते. आणि मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने त्यांना अधिस्वीकृती समितीवर घेण्यात आलं होतं. चांगला संघटित असलेला चांगला हाडाचा पत्रकार असलेला तरुण पत्रकार आज आपल्यातून निघून गेला आहे. सरकारच्या निष्काळजीपणाचा तो बळी गेलेला आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की, त्यांना ऍम्ब्युलन्स मधून घेऊन जात असताना मध्येच सिलेंडर संपला. त्यांच्यासोबत असलेले डॉक्टर, नर्स त्यांना नवीन सिलेंडर लावता आला नाही. त्यामुळे पंधरा मिनिटं त्यांचा ऑक्सिजन तुटला गेला आणि त्याच दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या सर्व प्रकरणाची चौकशी करावी अशी आपण मागणी केलेली आहे. रायगडचे जिल्हाधिकारी मिलिंद चौधरी यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. केवळ चौकशी करून चालणार नाही तर यापुढे कुठल्याही पत्रकारावर अशा पद्धतीची वेळ येऊ नये या दृष्टीने देखील सरकारने काळजी घ्यावी अशी आपण सरकारकडे मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे विनंती केलेली आहे. त्याचबरोबर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या बुलढाणा येथील कार्यक्रमांमध्ये सांगितलं होतं की पत्रकार आणि माध्यम कर्मी हेच खरे कोरोना योद्धे आहेत. कोरोना च्या काळात यांचे जर निधन झाले तर त्यांना आम्ही पन्नास लाख रुपये मदत पत्रकारांना देऊ परंतु सातत्याने दररोज हे पत्रकार बळी जात आहेत. कोरोनाने आजच सकाळी ठाण्यावरून एक फोन आला की प्रसाद कांबळे नावाचे पत्रकार दगावले.
आतापर्यंत असे एकूण 17 पत्रकारांचं 31 जुलै नंतर निधन झालेलं आहे कोरोनाने . हि अत्यंत दुःखदायक घटना आहे. जे मरण पावलेले आहेत त्यांना आर्थिक मदत मिळण्यासाठी आपण एक हजार पत्रांचे निवेदन आणि ई-मेल सरकारला सादर करणार आहोत. साधारणता ज्या पत्रकारांचं निधन झालेलं आहे ते सर्व चाळीशीतल्या आतले आहेत.असं सांगितलं जातं की तरुण पत्रकार पांडुरंग रायकर यांचे वय 40 च्या आसपास होत संतोष पवार यांचे वय पन्नासच्या आसपास होतं .नागपूर जिल्ह्यामध्ये वाडी येथील तरुण पत्रकारांचे सुद्धा निधन झालेलं आहे. त्यांचं वय चाळीसच्या आसपास होते. हे सगळं तरुण वयाच्या पत्रकारांना होत आहे. परंतु माझ्या सर्व पत्रकारांना विनंती आहे कि आपणच एकमेकांना सहकार्य केले पाहिजे. यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. सोशल डिस्टंसिंग ठेवून एकमेकांची काळजी घेतली पाहिजे. सातत्याने हात सँनेटाईज करणे, जास्तीत जास्त गर्दीपासून दूर राहावं. स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्यावी. एखादी बातमी नाही मिळाली तरी चालेल परंतु जीव धोक्यात घालून कुठल्याही गर्दीमध्ये घुसू नका. गरज नसेल तर घराच्या बाहेर पडू नये. असे महाराष्ट्रातल्या सर्व पत्रकारांना आवाहन करत मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने व त्यांच्या कुटुंबाच्या वतीने त्यांनी सर्वांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत केज मधील आदर्श पत्रकार संघाच्या वतीने देखील श्रद्धांजली अर्पण करण्यात आली व केज तहसीलदार यांना निवेदन व मुख्यमंत्री उद्ददव ठाकरे यांना ई मेल करण्यात आला. सदरील निवेदनावर विजय आरकडे, प्रकाश मुंडे, अशोक सोनवणे, धनंजय कुलकर्णी , गौतम बचुटे अनिल गलांडे, बळिराम भोसले, दशरथ चौरे, आगे चंद्रकांत पाटील,रमेश इथापे व घोळवे यांच्या सह्या आहेत.

