shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कोरोनामुळे ग्रामीण भागातून होत आहे माणुसकी दुर्मिळ, प्रबोधना ची गरज...!!

अलिबाग : राजेश बाष्टे 
गावात कोरोनाची वाढणारी रुग्ण संख्या हा चिंतेचा विषय झाला आहे. नक्की काय करायचं या बाबत सर्वच ग्रामस्थ विचारात पडले आहेत. अजून या बाबत स्पष्टीकरणही केले जात नाही. त्यामुळे गावाकडील लोकांची मानसिकता दिवसेंदिवस खचत चालली आहे. कोरोनावर अजून हि ओषंध निघालेले नाही पण मानसिक खच्चीकरणाचे मुख्य कारण आहे. 

कोरोना पेशंट व त्यांच्या संबधित नातेवाईका बरोबर इतर लोकांची असणारी वागणूक मोठ्या प्रमाणावर बदलत आहे, सोशल डीसटन्स म्हणजे त्या कुटुंबाशी पूर्णपणे संपर्क तोडणे अशी काहीशी मानसिकता गावाबरोबर शहराठिकाणीहि वाढू लागली आहे. पूर्वी माणुसकी हा शब्द गावातल्या घराघरात रूढ झाला होतो. 

तो केवळ ग्रामस्थांनच्या माणुसकीच्या वागण्यामुळे, एकमेकांच्या मदतीला धावण्यामुळे, पण आता मात्र स्पृश, अस्पृशा सारखे वागण्यात झालेला बदल केवळ कोरोनाच्या महामारीमुळे झालेला असला तरी स्वत:ला वाचवताना आपण माणुसकी हरवून बसणार नाही न अशी वाटण्यासारखी परिस्थिती सध्या निर्माण होत आहे. 

जे लोक या कुटुंबाला, पेशंटला मदत करतात त्यांच्यापासून हि समाज सुरक्षित अंतर राखत चालला आहे, हे या कोरोनायोद्ध्यांच्या दृष्टीने नक्कीच दु:खदायक बाब असल्याची भावना या कोरोना योंध्यामार्फत व्यक्त होत आहे. कोरोना संसर्गजन्य आहे. त्यापासून सर्वतोपरी प्रत्येकाने काळजी घेणेहि गरजेचे आहे. पण समाजप्रिय असणाऱ्या माणुसकीच्या धाग्याच अस्तित्व टिकवायच तर कुठेतरी या कोरोना काळातही माणुसकी जिवंत राहण्यासाठी समाजसेवकांनी पुढाकार घेण महत्वाचे आहे.

हे सर्व प्रबोधना द्वारे होऊ शकते. आज अंगावर आजारपण काढणाऱ्यांची संख्या वाढते आहे. ते केवळ समाज आपल्याला दूर सारेल या भीती पोटी हे कुठे तरी थांबवणे गरजेचे आहे. प्रशासनाने हि या बाबत लोकजागृतीच्या माध्यमातून याला हातभार लावावा. अशी भावना ग्रामीण,शहरी नागरीकांन मार्फत व्यक्त होत आहे.   
close