shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कोरोना च्या पार्श्वभूमीवर प्रतीक्षा मुव्हीज निर्मित "बात्तकु" (एक वास्तविकता) या चित्रपटाच्या प्री-प्रोडक्शन च्या कामाला परत नव्या उमेदीने सुरवात..!!


"दैनिक "शिर्डी एक्स्प्रेस"  च्या माध्यमातून भागातील इच्छुक कलाकारांसाठी आंतरराष्ट्रीय  कुस्तीपटू राजकुमार आघाव यांनी ऑडिशन साठी घेतला पुढाकार...

आज लॉकडाऊन मुळे बहुतेक जण मानसिकदृष्टया खचून गेला आहे म्हणून आज आपण कुठल्याही क्षेत्रात असलो तरी एकमेकांना सहकार्य करणे,समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे. कुठलेही दिवस हे जातच असतात हे ही नक्कीच जातील...



जेव्हा आपण सिनेक्षेत्रात येण्याची स्वप्न पाहत असतो,
उदा:जर आपण अभिनय करत असाल तर आपलं स्वप्न असतं की एक दिवस मी मोठया पडद्यावर दिसलो पाहिजे, 

जर दिग्दर्शन करत असेल तर आपलं स्वप्न असतं की एक दिवस माझा चित्रपट रिलीज होऊन सर्व लोकांनी पाहिला पाहिजे, किंवा सर्व लोकांपर्यंत पोहचला पाहिजे.

एक व्यक्ती म्हणून, एक कलाकार म्हणून किंवा साधारण माणूस म्हणून ही , अशी स्वप्न असणे उराशी बाळगणे  ही चांगली गोष्ट आहे..

कोरोनाच्या महामारीमुळे सर्वांचेच अतोनात नुकसान तर झालंच आहे यात दुमत नाही पण त्याला घेऊन निराश बसण्यापेक्षा त्याच उमेदीने परत कामाला लागूया असं म्हणत. "बात्तकु"( एक वास्तविकता)
ह्या चित्रपटासाठी Pre-Production चं काम सध्या चालू केलं आहे, त्याचाच एक भाग म्हणून चित्रपटात काम करणाऱ्या सर्वच कलाकारांची शोधाशोध सुरू आहे, मग अश्यातच लॉकडाऊन चा काळ,

म्हणून सहा महिने थेट ऑडिशन साठी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाकडून परवानगीच नव्हती.

शाळा कॉलेज ही बंद असल्यामुळे नवीन चित्रपट निर्मात्यांना कलाकारा पर्यंत आणि कलाकारांना निर्मात्या पर्यंत पोहचताच येत नाही म्हणून याची गरज ओळखून खास अहमदनगर जिल्हयातील कलाकारांसाठी, अहमदनगर जिल्हयाचेच आदरणीय आंतरराष्ट्रीय  खेळाडू राजकुमार आघावपाटिल यांनी पुढाकार घेऊन, कोरोना ची नियमावली आणि अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या परवानगीने ऑडिशन चे नियोजन केले आहे तरी इच्छुक कलाकारांनी या संधी चा लाभ घ्यावा असे आवाहन चित्रपटाचे तरुण दिग्दर्शक रमेश पवार आणि राजकुमार आघाव पाटिल यांनी केले आहे.

चित्रपटाची निर्मिती प्रतीक्षा मुव्हीज च्या बॅनर खाली होणार असून..
सदरील ऑडिशन दिनांक 13 सप्टेंबर 2020 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत हॉटेल संजोग आणि लॉन्स नगर मनमाड रोड अहमदनगर येथे होतील.
close