सावळीविहीर (प्रतिनिधी) :
शिर्डी येथील श्री साईबाबा सुपर हॉस्पिटल मधील एका डॉक्टरने शिर्डीतील कालिकानगर भागात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुली चा तपासणी करण्यासाठी गेले असता विनयभंग केल्याची घटना नुकतीत घडली असून शिर्डीत त्यामुळे मोठी चर्चा सुरू झाली असून खळबळ उडाली आहे.या लिंगपिसाट डॉक्टरला रात्री पोलिसांनी उशिरा ताब्यात घेतले असून या डॉक्टरला  कोपरगाव सत्र न्यायालयात  हजर केले असता आज तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. 

या डॉक्टर विरोधात शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये गु,रजि,नं.1. 627/2020 प्रमाणे भा,द,वि, कलम 354 अ/ब आणि बालकांचे लैगिंक शोषनाचे कलम 8/10प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे, या डॉक्टरांनी यापूर्वीही सुपर हॉस्पिटल मधील तातडीच्या रुग्ण तपासणी विभागा मध्येही ही एकदा असाच प्रकार केल्याचे आता चर्चा होत आहे. त्याचप्रमाणे हे प्रकरण तेथे त्यावेळी  मिटविण्यात आले होते. तसेच येथील एका नर्सशीही त्याने असाच गैरप्रकार केल्याचे ही आता बोलले जात आहे .तशी चर्चा येथे सुरू आहे.या सर्व प्रकारामुळे शिर्डीत मात्र चर्चेला मोठे उधाण आले असून श्री साईबाबा सुपर हॉस्पिटल मधील ह्या डॉक्टर  वैभव बबन तांबे याने यापूर्वीही येथे आणखी महिला रुग्णांना तपासणीच्या नावाखाली असे काही अश्लील चाळे केले आहे की काय?

याची चौकशी आता सुरू झाली आहे. अनेक महिला, मुली डॉक्टरांना देव म्हणून डॉक्टरांकडे आपली सर्व माहिती, सर्व काही सांगत असतात.याचाच काही डॉक्टर गैरफायदा घेत असल्याचे यावरून दिसून येत आहे. कोरोणाच्या काळात संपूर्ण देशात ,जगात डॉक्टरांनी मोठे कोरोना योध्देचे काम केले. त्यामुळे डॉक्टरांकडे पाहण्याचा सर्व जगाचा दृष्टिकोन एक देवदूत म्हणून झाला असला तरी या डॉक्टरा मध्ये काही डॉक्टर तांबे सारखे लिंगपिसाट डॉक्टर आहेत. 

की त्यांचे नजर आपल्याच मुली बहिणींवर राहते, कोणत्याही दवाखान्यात गेल्यानंतर प्रत्येक महिला रुग्णही डॉक्टरांना देवस्वरूप मानते व आपल्याला काय आजार आहे किंवा काय होते हे स्पष्ट डॉक्टरांशी बोलत असते .डॉक्टरांवर पूर्ण विश्वास ठेवत असते.मात्र त्याचा गैरफायदा काही बोटावर मोजण्याइतके काही डॉक्टर  घेत असतात.

तोच प्रकार शिर्डीत काल घडला असून सुपर हॉस्पिटल मधील एक  डॉक्टर तांबे नामक डॉक्टरने कालिका नगर येथील एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला आहे. त्याचा गुन्हा शिर्डी पोलीस स्टेशनला दाखल झाला असून या लिंगपिसाट डॉक्टर तांबे याने या पूर्वीही येथे  असे  काही प्रकार केले आहेत की काय ? व त्यांचे वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी  नेमके काय करतात? याची चर्चा शिरडी त सुरू झाली आहे ,या डॉक्टराला रात्री पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याला आज कोपरगाव सत्र न्यायालयात नेले असता तीन दिवस पोलिस कोठडी मिळाली आहे ,त्यामुळे येथे खळबळ उडाली असून श्री साईबाबा सुपर हॉस्पिटल मधील वरिष्ठ डॉक्टर व हॉस्पिटल चे प्रशासन नेमके काय करते? याची आता शिर्डीत चर्चा होत आहे.