shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

जिल्ह्यातील नेते ,अभिनेते, डॉक्टर ,खेळाडू प्रमाणेच आता पोलीस अधीक्षकही कोरोनाच्या ताब्यात..!!



सावळीविहीर (प्रतिनिधी) :
 जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक अखीलेश कुमार सिंह हे कोरोना पॉझिटिव निघाले असून त्यामुळे पोलिस दलात मोठी खळबळ उडाली आहे.त्याच प्रमाणे अहमदनगर जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार हेही कोरोना बाधित निघाले असून यामुळे अहमदनगर जिल्हा पोलिस दलात आता मोठी भीती निर्माण झाल्यासारखे चित्र निर्माण झाले आहे.दोन्ही अधिकाऱ्यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे व आपल्या संपर्कात आलेल्या प्रत्येक व्यक्तीने आपली कोरोना चाचणी करून घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी यात म्हटले आहे.दोन्ही अधिकाऱ्यांनी अलगीकरण कक्षात स्वतःला दाखल करून घेत उपचार सुरू केले आहेत.

अहमदनगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांची अहमदनगरहुन बदली झाली आहे. मात्र त्यांना अजून ठिकाण मिळालेले नाही व त्यांनी अजून येथिल  पदभार सोडलेला नाही.त्यांच्या जागेवर सोलापूर हुन मनोज पाटील हे नवीन जिल्हा अधीक्षक म्हणून बदलून आलेले आहेत. मात्र त्यांनी अद्याप पदभार स्वीकारलेला नाही, त्यामुळे सध्या अखीलेश कुमार सिंह हेच अहमदनगर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक म्हणून काम करत आहेत, असे असताना त्यांना कोरोना ची लागण झाल्याचे आज स्पष्ट झाले आहे.त्याचबरोबर अहमदनगर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनाही कोरोनीची बाधा झाल्याचे आज स्पष्ट झाले आहे.जिल्हा पोलीस अधीक्षक असल्यामुळे अखिलेशकुमार सिंह तसेच स्थानिक गुन्हे विभागाची जबाबदारी असल्यामुळे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी गेल्या तीन चार दिवसापासून विविध ठिकाणी भेटी दिल्या आहेत.

अखिलेश कुमार सिंह व दिलीप पवार हे दोघे पोलीस  अधिकारी शिर्डी येथे दोनच दिवसापूर्वी येऊन गेले होते. राहता येथील श्री वीरभद्र मंदिरात झालेल्या चोरीप्रकरणी त्यांनी शिर्डीत पत्रकार परिषद घेतली होती.या पत्रकार परिषदेला शिर्डीचे पोलीस उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाकचौरे, तसेच शिर्डी पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक दीपक गंधाले व वाहतुकीचे पोलीस निरीक्षक गोकावे आदींसह सहाय्यक पोलीस निरीक्षक व इतर पोलीसअधिकारी उपस्थित होते.त्यामुळे आता या अधिकाऱ्यांचेही कोरोना तपासणी होणे आता महत्त्वाचे ठरणार आहे, अशी चर्चा शिर्डीत होत असून प्रत्येकाने आता काळजी घेणे महत्त्वाचे आहे.कोरोना काळात ज्यांनी कोरोना योध्येचे अहोरात्र काम केले.तेच आता  कोरोणा बाधित होत आहेत. कोरोणाची संसर्ग साखळी वाढत चालली आहे.

त्यामुळे कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.त्यामध्ये  आता सर्वसामान्यांप्रमाणेच राजकारणी, महसूल अधिकारी, नगरपंचायत ,महानगरपालिकेचे अधिकारी, डॉक्टर ,नर्स ,पत्रकार, व्यापारी उद्योगपती, नेते अभिनेते खेळाडू यांच्यासह पोलिस अधिकारी याता कोरोणा बाधित निघत असून या कोरोणाने प्रत्येक क्षेत्रात शिरकाव केला असल्याचे दिसून येत आहे.
close