पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन ..!!
शिर्डी( प्रतिनिधी)
राहाता तालुक्यातील बाभळेश्वर येथील दि,मुळा-प्रवरा वीज संस्था व डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन च्या वतीने सभासदांसाठी कोव्हीड चाचणी केंद्राचा शुभारंभ नुकताच आमदार राुधाकृष्ण विखे व भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यात विविध कार्यक्रम घेण्यात येत असुन त्या कार्यक्रमात बाभळेश्वर येथे दि, मुळा प्रवरा वीज संस्था आणि डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन यांच्या वतीने सभासदांसाठी हा कोव्हीड चाचणी केंद्राचा शुभारंभ करुन यावेळी या संस्थेतील सभासदांना मोठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे, त्यामुळे या संस्थेतील सभासद येथे कोरोना चाचणी करू शकतील.दि मुळा-प्रवरा वीज संस्था कार्यक्षेत्र राहता श्रीरामपूर संगमनेर तालुक्यात मोठ्या प्रमाणात विखुरलेले आहे.
या संस्थेचे सभासद मोठ्या प्रमाणात आहेत .त्यांना येथे चाचणी करणे सोपे होणार आहे,त्याचप्रमाणे येथे वृक्षरोपणही करण्यात आले.व जनसेवा फाउंडेशनच्या वतीने मोफत अपघात विमा धनादेश प्रदान करण्यात आला .यावेळी माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील,भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, गटनेते जालिंदर वाकचौरे, पंचायत राहता पंचायत समितीच्या सभापती नंदा तांबे, जिल्हा परिषद सदस्य कविता लहारे, बबलू मस्के व मुळा-प्रवरा वीज संस्थेचे संचालक व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी सोशल डिस्टंन्स व मास्कचा वापर करण्यात आला.या कार्यक्रमाला दि मुळा-प्रवरा वीज संस्थेचे काही सभासद व कार्यकर्ते यांनीही आपली कोरोना चाचणी करून घेतली.
त्याच प्रमाणे नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त राहता शहरातही शिर्डी मतदार संघातील आशा सेविकांना आमदार विखे यांच्या सहकार्याने कोव्हीड कवच विमा पॉलिसी व ऑक्सीमिटर,आणि एस95 मास्कचे वितरण करण्यात आले, त्याच प्रमाणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रक्तदान शिबिर घेण्यात आले व वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी अहमदनगर जिल्ह्याचे अहमदनगर जिल्ह्याचे भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, गटनेते जालिंदर वाकचौरे, गणेश सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष मुकुंदराव सदाफळ, डॉक्टर राजेंद्र पिपाडा, शिर्डीच्या नगराध्यक्ष अर्चनाताई कोते, पंचायत समिती सभापती नंदा तांबे ,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बापूसाहेब आहेर, तहसीलदार कुंदन हिरे, गट विकास अधिकारी समर्थ शेवाळे व सर्व वैद्यकीय अधिकारी, व राहाता तालुक्यातील सर्व आशा वर्कर उपस्थित होत्या.

