नगर : वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले, तर शेतकऱ्यांनी शासनाकडे  नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. 

 नगर तालुक्यातील नांदगाव शिंगवे या गावात पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. फळबाग, सोयाबीन, कपाशी यांचे मोठे नुकसान झाले आहे, तर ऊस, मका, बाजरी ही पिके या पावसाने भुईसपाट झाले.

यामुळे शेतकऱ्यांच्या हाता- तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला. शेतकऱ्यांनी त्यांची आर्त व्यथा मांडली आहे. चालू वर्षी पीक जरा बरे आलीत, पावसाने ते सुद्धा उद्धवस्त झाले. तरी शासनाने याची   योग्य दखल घेऊन लवकरात लवकर पंचनामा करून नुकसान भरपाई  व योग्य ते अनुदान द्यावे..
यामध्ये अनिल जाधव ,साहेबराव सोनवणे, लियाकत शेख, अन्सार शेख ,दादासाहेब बरकडे ,पोपट कारंडे ,बाळासाहेब  सरक, भीमा वाघेरे, यांसह अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की लॉक डाऊन मध्ये
भाजीपाल्याला भाव नव्हता व आम्ही हे कर्ज काढून पिके केली होती. झालेल्या नुकसानीची त्वरित पंचनामे करावीत व प्रशासनाने पंचनामा करून शेतकर्‍यांना भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.