राजगुरुनगर : विद्याधर साळवे
राजगुरुनगर दि.१०-०९-२०२०
महिला शक्ती ट्रस्ट दिल्ली द्वारा आयोजित येथील महिला शक्ती खेड तालुका कार्यालयाचे उद्घाटन राजगुरुनगर येथे राजगुरुनगर सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष किरण आहेर यांच्या हस्ते झाले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुभाष होले महिला शक्ती खेड तालुका अध्यक्ष नितीन गुरव महिला शहराध्यक्ष मनीषा सांडभोर तालुका महिला सल्लागार अँड. मनीषा टाकळकर उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना तालुकाध्यक्ष नितीन गुरव म्हणाले," निराधार आणि विधवा महिलांसाठी मासिक पेन्शन योजना सुरू करणे त्यांच्या समस्या सोडविणे आदी सेवाभावी उपक्रम या कार्यालयाच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहेत.तसेच यावेळी तालुका अध्यक्ष नितीन गुरव यांनी सांगितले की , " तालुक्यातील सर्व विधवा महिलांसाठी आजीवन पेन्शन योजना लागू करण्यात येणार असून त्यांच्या मुलांसाठी 22 वर्षांपर्यंत शिक्षणामध्ये सवलत, लाईट बिल , पाणी बिलामध्ये सवलत या संस्थेमार्फत सर्व सुविधा पुरविण्यात येणार आहेत. महिलाना आजच्या या युगामध्ये पेन्शन योजना देण्यात यावे आणि त्यातून त्यांचे कोटुंबिक जीवनात काहीतरी फायदा होईल त्यांच्या मुलांना शिक्षण घेण्यास थोडी फार मदत म्हणून उपयोग करता येईल असे यावेळी सांगण्यात आले.
या उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी संतोष गाडेकर सर , सौ.अलका जोगदंड आदी महिला कार्यकर्त्या व पदाधिकारी उपस्थित होते.

