shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

श्रीरामपूरमधील समाजसेवकांनी खरी सामाजिक बांधीलकी जोपासली- डॉ. दत्ता विघावे..!!

श्रीरामपूर: - कोरोना संक्रमणाच्या व लॉक डाऊनच्या काळात येथील वॉर्ड नंबर दोन मधील समाजसेवकांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून तसेच काहींनी पदरमोड करून गरजवंताना मदत पोहोचवली. ही त्या समाजसेवकांची सामाजिक बांधीलकी होती व ती त्यांनी खऱ्या अर्थाने जोपासली. असे कौतुकोदगार वर्ल्ड पार्लमेंटचे महाराष्ट्र ( श्रीरामपूर ) चॅप्टरचे अध्यक्ष तथा वर्ल्ड पार्लमेंटचे राष्ट्रीय मिडीया को -ऑर्डीनेटर डॉ. दत्ता विघावे यांनी काढले.

वर्ल्ड कॉन्स्टीट्यूशन अँड पार्लमेंट असोशिएशन ( डब्ल्यूसीपीए ) म्हणजेच जागतिक संविधान व संसदीय संघाच्या वतीने लॉकडाऊनच्या काळात कोविड -१९ पिडीतांना मदत करणाऱ्या देशभरातील डॉक्टर्स, आरोग्य सेवक, पोलिस, समाजसेवक, पत्रकार यांचा ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने " वर्ल्ड पार्लमेंट कोरोना वॉरीयर्स अवॉर्ड " देऊन गौरव करून त्यांना चांगल्या कामासाठी प्रेरित केले. त्याच कार्यक्रमाचा भाग म्हणून सदर सन्मान सोहळ्याचं आयोजन आलं होतं.

या प्रसंगी हाजी इमरान हाजी सादिक शेख,अन्वर सिकंदर शेख ,अर्शद रफीक इनामदार, फय्याज अब्दुल जब्बर कुरेशी, हाजी आरिफ हसन .बागवान, इम्रान मुसा पटेल ,जाफर हरून भाई शाहा, फिरोज कालू भाई शेख, जावेद हमीद शेख, फिरोज मोहम्मद हनीफ शेख ,शादाब रफिक पठाण, डॉक्टर सलीम सिकंदर शेख ,मोहम्मद वसीम मोहम्मद हनीफ शेख, अफजल सुलेमान मंसुरी , श्री. दीपक चरण दादा चव्हाण ,प्रवीण अशोक जमधडे ,डॉक्टर नवनीत पांडुरंग जोशी, निलेश नारायण सोनवणे, पंजाबराव दर्शन भोसले या समाजसेवकांना " वर्ल्ड पार्लमेंट कोरोना वॉरीयर्स अवॉर्ड " देऊन सन्मानीत करण्यात आले.

या प्रसंगी डब्ल्यूसीपीए कडून डॉ. दत्ता विघावे, जेष्ठ साहित्यीक प्रा.लेवीन भोसले, पत्रकार राजेंद्र देसाई हे उपस्थित होते तर हाजी आरीफभाई मित्र मंडळ, श्रीरामपूर शहर व तालुका मुस्लीम आरक्षण अधिकार कृती समिती व मुस्लीम विकास ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष व समाजसेवक फहीम शेख यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले होते.
close