इंदापूर । प्रतिनिधी (तात्याराम पवार)
तरंगवाडी दि.३/१०/२०२० रोजी जि .प. शाळा तरंगवाडी येथे इयत्ता १ ली ते ४ थी च्या सर्व विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत माहे जून २०२० ते माहे ऑगस्ट २०२० या कालावधीतील तांदूळ, मुगडाळ व हरभऱ्याचे वाटप करण्यात आले.
शालेय पोषण आहार वाटप करण्यापूर्वी सर्व माल शाळेच्या मुख्याध्यापकानी स्वतः वजन करून पिशव्यामध्ये पॅक केला होता .
सर्व पालकांनी तोंडावर रुमाल व मास्क बांधून सामाजिक अंतर पाळून अतिशय शिस्तबद्धरित्या शालेय पोषण आहार घेतला.
यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजेंद्रकुमार आण्णा वाघमोडे, उपाध्यक्ष सिंधु उत्तम यमगर, शिक्षणप्रेमी सदस्य तानाजी शिंदे व्यवस्थापन समिती सदस्य पोपट मारकड, गायत्री क्षिरसागर, उषा डोंबाळे दत्तू पारेकर ,तात्याराम तरंगे, सर्व सदस्य तसेच सामाजिक कार्यकर्ते पोपट कचरे शाळेचे सर्व शिक्षक उपस्थित होते. वरील माहिती मुख्याध्यापक उबाळे सर यांनी दिली .यावेळी पालकांमध्ये शिक्षकां प्रति आदर्श पद्धतीने केलेल्या कार्याचे कौतुक होताना दिसून आले.

