इंदापूर । प्रतिनिधी (तात्याराम पवार)
वरकुटे खुर्द दि.३/१०/२०२० काल 2 ऑक्टोबर २०२० हा दिवस महात्मा गांधी जयंती ,लालबहादुर शास्त्री जयंती, स्वच्छता दिन ,बाल सुरक्षा दिन ,म्हणून साजरा करण्यात येतो या दिवशी वृक्षमित्र सचिन मासाळ यांनी या आदर्श असणाऱ्या दिवसाचे निमित्त साधून आपल्या इंदापूर तालुक्यात सदरच्या काळात चालू घडामोडी मध्ये कार्य करणाऱ्या आदर्शवत अशा व्यक्ती कोण या चर्चेतून वृक्ष मित्र सचिन मासाळ म्हणाले की, तालुक्यात जनसामान्यांचे नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे रोज जनता पाहते असे व्यक्तिमत्व असणारे राजवर्धन दादा पाटील म्हणजे संस्काराची खान असून सर्व जाती-धर्मांमध्ये मिळून मिसळून त्यांच्या सुख-दुःखात सामील होणारी लहान अबाल वृद्धा मध्ये मिसळणारी एक रत्नाची खान आहे या वयात सर्वसामान्य कुटुंबात आपलं स्वतः च आदराचं स्थान निर्माण करणारे आणि तालुक्यातला उगवता तारा रोज कोणाच्यातरी सुखदुःखात दिसत आसणारे त्यांचा दररोज कौतुक करणारे लाखो लोक आपल्या वेगवेगळ्या माध्यमातून दादांना व जनतेला आपले प्रेम दाखवून देतात .
सोशल मीडियावर एकही दिवस असा नसतो की राजवर्धन दादा यांची पोस्ट आणि सुखदुःखातील फोटो नाही खरंच कोरोणा सारख्या या परिस्थितीत असं कार्य करणे ही बाब सोपी नाही अशाही काळात हाती आलेल्या प्रत्येक कार्याचे निराकरण करणे परखड आणि वस्तुस्थितीला धरून कार्य करणे हे सोपे नाही आज निरा भिमा सहकारी साखर कारखान्या सारखा नावाजलेल्या साखर कारखान्याचे ते संचालक म्हणून काम पाहत असताना सर्व बाबींवर अतिशय बारकाईने व्यक्तिगत लक्ष देण्याचे कार्य ही सर्व जनतेला दिसून येते आहे हिरा हा कोठेही ठेवा तो चमकत राहतो तसा राजवर्धन दादा व त्यांचे कार्य सतत चमकत राहणार यात किंचितही शंका निर्माण होणार नाही त्यांच्या या कार्याला या शुभ दिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!

