हिंगोली । प्रतिनीधी(विश्वनाथ देशमुख)
दि.०३,हिंगोली जिल्ह्यातील सेनगांव तालुक्यातील "आजेगांव येथील युवा शेतकर्याचा विद्युत जोडणीसाठी सहकुटुंब आत्मदहनाचा इशारा"या मथळ्याखाली शिर्डी एक्सप्रेस न्युजने बातमी प्रकाशीत करताच दि.०३ आँक्टोबर शनिवार रोजी महावितरणचे इंजिनीयर देशमुख यांनी कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन त्या शेतकर्यांच्या शेतात जाऊन विजजोडणी करुन दिली.
आजेगांव येथील युवा शेतकरी भागवत नारायण वाघ यांनी आपल्या शेतातील विद्युत विज जोडणीसाठी कोटेशनसाठी २०१३ साली रक्कम भरुन ही महावितरण कंपनीकडून सात वर्षापासून त्यांना जोडणी दिली नव्हती.शेतकरी भागवत वाघ यांनी हिंगोली महावितरण कार्यालयाला दि.०१ आँक्टोबर गुरूवार रोजी निवेदन दिले होते की,मला पाच दिवसात विज जोडणी न दिल्यास दि.०७ आँक्टोबर बुधवार रोजी आपल्या कार्यालयात सहकुटुंब आत्मदहन करणार या विषयी "शिर्डी एक्सप्रेस न्युज"ने बातमी प्रकाशीत करताच महावितरणचे इंजीनियर श्री देशमुख आपल्या कर्मचा-यासह शेतकरी वाघ यांच्या शेतात दि.०३ आँक्टोबर शनिवार रोजी जाऊन संबधीत शेतक-यास विज जोडणी करुन दिल्याने शेतकरी वाघ यांनी "शिर्डी एक्सप्रेस न्युज"चे आभार मानले.

