shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शेळगाव येथे शुभम केक हाऊसचा अभिनव उपक्रम...शुभेच्छांसह कोरोना जनजागृती.. भारत ननवरे..!!

इंदापूर । प्रतिनिधी ( तात्याराम पवार)
शेळगाव दि.४ ऑक्टोबर २०२० शेळगाव येथील श्री भारत ननवरे सर व रेखा भारत ननवरे यांनी शुभम केक हाऊस या छोट्याशा व्यवसायाबरोबर कोरोना संदर्भात माहिती पत्र देऊन जनजागृती केली आहे.कोरोनामुळे अनेक लोक बेरोजगार झाले.


अनेकांचे छोटे व्यावसाय संपुष्टात आले. वाढदिवस हा सर्वाच्या आयुष्यातील आनंदाचा क्षण आणि केक नसेल तर वाढदिवस कसा बच्चेकंपनीचा आवडता पदार्थ तोही केक म्हणून तेलओढा (शेळगाव) येथील रेखा भारत ननवरे यांनी कोरोना काळात आईस केक बनवण्याचे प्रशिक्षण घेतले व त्या घरीच केक बनवू लागल्या.कोरोना पादुर्भाव व सतत च्या लॉकडाउन मुळे घरगुती केक ला मागणी वाढू लागली.आपण ही कोरोना जनजागृती करावी म्हणून शुभम केक हाऊस मधून केक खरेदी करण्याऱ्या प्रत्येकाला शुभेच्छा पत्र लिहून जनजागृती करत आहेत. त्यामध्ये वाढदिवसाचा शुभेच्छा संदेश व कोरोना जनजागृती व्हावी म्हणून गर्दी टाळा,मास्क वापरा, सुरक्षित अंतर ठेवा,विनाकारण घराबाहेर पडू नका,सोशल डिस्टन्स राखून वाढदिवस साजरा करा,रुग्णांसाठी प्रार्थना करा असे अनेक संदेश शुभेच्छा पत्र लिहून केक सोबत देत आहेत.त्या हा उपक्रम नियमितपणे राबवणार आहेत.कोरोना संपल्या नंतर पण पाणी,हवा,ध्वनी प्रदूषण, वृक्षारोपण ,मतदान जनजागृती अशा अनेक विषयांवर शुभेच्छापत्र देत राहणार अशी माहिती भारत ननवरे यांनी  सांगितले.शुभम केक हाऊसच्या या अभिनव उपक्रमाचे सर्वत्र स्वागत होत असल्याचे दिसत आहे.
close