shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अहमदनगर जिल्ह्यातील उर्वरित खंडकऱ्यांना या वर्षाअखेर मिळणार जमिनी! जिल्हाधिकारी डॉक्टर भोसले यांचे आश्वासन..!!


सावळीविहीर (राजकुमार गडकरी)
अहमदनगर जिल्ह्यातील राहिलेल्या सुमारे 138 खंडकऱ्यांना या वर्षअखेर त्यांच्या जमिनी परत मिळणार आहेत व खंडकरी यांचे जिल्ह्यातील चारी, रस्ते आदी विविध प्रश्न संदर्भात त्वरित मार्ग काढण्याच्या सूचना जिल्हाधिकारी भोसले यांनी त्या त्या विभागातील अधिकाऱ्यांना दिल्याआहेत.त्यामुळे खंडकरांमधून समाधान व्यक्त होत आहे .अहमदनगरचे नवीन आलेले जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी नुकतीच अहमदनगर येथील नियोजन भवनात जिल्ह्यातील सर्व  शेती महामंडळाचे मळ्याती
ल अधिकारी,खंडकरीचे प्रतिनिधी व शासकिय अधिकारी यांची संयुक्त आढावा बैठक घेतली.

यावेळी शिर्डीचे प्रांताधिकारी गोविंद शिंदे तसेच इतर प्रांत अधिकारी जिल्ह्यातील सर्व शेती महामंडळ मळ्यातील त्यावर व्यवस्थापक, तहसीलदार महसूल अधिकारी, व खंडकर यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

अहमदनगर जिल्ह्यांमध्ये खंडकरांच्या  किती जमिनी दिल्या व किती राहिल्या याची माहिती घेतली व जिल्ह्यातील खंडकरी यांचे विविध प्रश्न ही समजून घेतले.सुमारे एक फेकून 138 खंडकरी जिल्ह्यामध्ये असे आहेत की त्यांना अजुन जमिनी मिळाल्या नाहीत.अशा राहिलेल्या खंडकऱ्यांना या वर्षाअखेर त्यांच्या  जमीनी देणार आहोत.
व त्या देण्यासाठी संबंधित शासकीय अधिकाऱ्यांनी त्वरित निर्णय घेण्याचे आदेश यावेळी त्यांनी दिले. त्याच प्रमाणे खंडकऱ्यांना शेतीसाठी चारी रस्ते यांची व्यवस्था व्हावी म्हणून संबंधित विभागातील अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे .असे सूचना केल्या.

त्यासाठी संबंधित विभागातील प्रांत अधिकारी, खंडकरी प्रतिनिधी व शेती महामंडळातील अधिकारी यांची संयुक्त बैठक घेऊन हे प्रश्‍न सोडवावेत.असेही यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी या बैठकीत अधिकाऱ्यांना सांगितले, या आढावा बैठकीत खंडकरांच्या प्रतिनिधीनानी  खंडकरांच्या विविध प्रश्न ,समस्या यावेळी  मांडल्या तसेच शेती महामंडळाचे व्यवस्थापकीय अधिकारी यांनीही ही जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या मळ्यातील जमिनीची माहिती दिली.

यावेळी जिल्ह्यातील  लक्ष्मीवाडी मळ्यातील स्थावर व्यवस्थापक अभंग , व खंडकरी प्रतिनिधी बाळासाहेब जनार्दन जपे, भाऊसाहेब कातोरे ,त्याच प्रमाणे श्रीरामपूरचे अण्णासाहेब थोरात, चांगदेवनगर मळ्यातील गंगाधर चौधरी, वारीचे मच्छिंद्र टेके, कोपरगावचे अड,काजळे वालचंदनगरचे बी,टी,पाटील, बेलवडीं शेती महामंडळ मळ्यातील खंडकरी प्रतिनिधी,रावसाहेब काकडे  , पुणतांबाचे डॉक्टर धनंजय धनवटे ,आदींसह विविध मळ्यातील स्थावर व्यवस्थापक व काही खंडकरी प्रतिनिधी यावेळी या बैठकीला उपस्थित होते.

या बैठकीमध्ये अहमदनगरला नव्यानेच बदलून आलेले जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांचे स्वागत व सत्कार राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती बाळासाहेब जपे यांनी यावेळी केला.या आढावा बैठकीला जिल्ह्यातील सर्व प्रांत अधिकारीही व महसूलचे अधिकारी उपस्थित होते.
close