shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

तरुणांनी आता नोकरी व शेतीबरोबरच व्यवसायाकडे वळले पाहिजे-आ.विखे..!!


सावळीविहीर( प्रतिनिधी):
ग्रामीण भागातील तरुणांनी आता नोकरी व शेती बरोबरच उद्योग व्यवसायाकडे वळले पाहिजे असे मत माजी विरोधी पक्षनेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केले.

राहाता तालुक्यातील सावळीविहीर  बुद्रुक येथे नगर-मनमाड रोड लगत असणाऱ्या आगलावे कॉम्प्लेक्सचे उद्घाटन आमदार विखे यांच्या हस्ते झाले. यामध्ये डॉ.काळे व डॉ.सौ. म्हस्के यांचे हॉस्पिटल राहणार आहे, त्याच प्रमाणे कृषी, मेडिकल व इतर दुकाने ही असणार आहेत.

त्यामुळे तरुणांना येथे व्यवसायातून उत्पन्नाचे साधन निर्माण झाले आहे. सध्या शेती मध्ये आर्थिक उत्पन्न फारसे मिळत नाही. त्याचप्रमाणे नोकरीही आता लवकर लागत नाही. शिक्षण घेऊनही पुढे तरुणांना मोठ्या अडचणी निर्माण होतात. 

त्यामुळे आता शिक्षण ,शेती याच बरोबर आता तरुणांनी व्यवसायाकडे वळले पाहिजे, व्यवसायातुन आपले आर्थिक उत्पन्न वाढवणे आता गरजेचे झाले असल्याचे मत आ.विखे यांनी यावेळी व्यक्त केले.

त्यानंतर काही वेळाने आ. आशुतोष काळे यांनीही येथे भेट दिली व शुभेच्छा दिल्या. यावेळी राजेंद्र आसराज आगलावे ,सागर आगलावे किरण आगलावे ,डॉ.काळे ,संजय आरणे, होन तसेच गावातील कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. आमदार विखे यांनी गावात श्री परशुराम मंदिरासमोरील जपे यांच्या कृषी सेवा केंद्राचे उद्घाटनही केले. तसेच  गावातील कार्यकर्त्यांशी हितगुज साधला.आ.विखे यांनी विविध विषयावर सामाजिक दुरीचे अंतर ठेवुन गप्पा मारल्या.यावेळी अनेक  कार्यकर्ते उपस्थित होते.
close