shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पाच लाख आणि कारच्या मागणीसाठी विवाहितेला घरातून बाहेर हाकलले..!!

पिंपरी चिंचवड:-माहेरहून पाच लाख रुपये आणि बेलेनो कार घेऊन येण्याची मागणी करत सासरच्या मंडळींनी विवाहितेचा छळ केला. तसेच तिला घरातून हाकलून दिले. ही घटना 27 मे 2015 ते 23 सप्टेंबर 2020 या कालावधीत घडली.

रवी पाठक, मीना पाठक, राहुल पाठक, रोहित पाठक (सर्व रा. पिंपळे सौदागर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत 26 वर्षीय विवाहितेने बुधवारी (दि. 28) सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विवाहितेला लग्नामध्ये हुंडा कमी दिला. त्यामुळे माहेरहून पाच लाख रुपये आणि बेलेनो कार घेऊन येण्याची मागणी केली. त्यासाठी विवाहितेने नकार दिला असता आरोपींनी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करून त्रास दिला.

तसेच विवाहितेच्या वडिलांना ‘तुम्ही तुमच्या मुलीला घेऊन जा, तिला कार व पैसे घेऊन न येता पाठवल्यास मारून टाकू’ अशी धमकी दिली. विवाहितेला घरातून बाहेर हाकलून दिले.

याबाबत आरोपींवर भारतीय दंड विधान कलम 498 (अ), 506, 34, हुंडा प्रतिबंध अधिनियम कलम 04 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सांगवी पोलीस तपास करीत आहेत.
close