shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

इंदुरीकर महाराजांची सुनावणी टळली ; पुढील सुनावणी होणार २५ नोव्हेंबरला...!!

संगमनेर प्रतिनिधी : ऋषिकेश जगताप :
'सम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगा होतो आणि विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते’ असं वादग्रस्त वक्तव्य किर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी केलं होतं. यावरून इंदुरीकर महाराजांवर गुन्हा दाखल करण्यात येऊन दि.२८ आक्टोबरला संगमनेर येथील जिल्हा न्यायालयात इंदुरीकर महाराजांची सुनावणी टळून पुढील सुनावणी २५ नोव्हेंबरला होणार आहे.

दिनांक २८-१०-२० ला संगमनेर जिल्हा न्यायालय मध्ये इंदुरीकर महाराजांची सुनावणी होती. ती सुनावणी सध्या तरी टळली आहे. इंदुरीकर महाराजांनी 'सम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगा होतो आणि विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते’ असं वादग्रस्त केले होते.

याच बाबत संगमनेर जिल्हा न्यायालयात ही सुनावणी होती आणि ती सध्या तरी टळली आहे. इंदुरीकर महाराजांना न्यायालयाने हजर राहण्याचे आदेश दिले होते.वरील याचिकेविरूध्द इंदुरीकर महाराजांनी आव्हानात्मक याचिका दाखल जिल्हा न्यायालयात केली आहे.या याचिकेला आता कोर्टाने स्थगिती देऊन पुढील सुनावणी आता २५ नोव्हेंबरला होणार आहे. याची माहिती महाराजांच्या वकील खेडी धुमाळयांनी दिली या सुनावणी मुळे महाराजांना थोडासा दिलासा मिळाला आहे.
close