मंगल कार्यालय चालक संघटनेच्या बैठकीत संगमनेर मध्ये मागणी...
संगमनेर: संगमनेर मंगल कार्यालय चालक संघटनेची बैठक पार पडली आहे. यामध्ये त्यांनी काही मागण्या केल्या आहेत . यात मंगल कार्यालय मध्ये ५०० ते१००० लोकांना सहभागी होण्याची परवानगी द्यावी. अशी मागणी मंगल कार्यालय चालक संघटनांनी करून यामध्ये आमच्या भावना आम्ही सरकार पुढे मांडणार असल्याचे सांगितले आहे.
यामध्ये मंगल कार्यालय चालकांनी सरकारपुढे प्रश्न उपस्थित केला आहे की एसटी मध्ये ५० प्रवाशांना परवानगी देत मग दहा ते वीस हजार चौरस फूट पासून दोन एकर क्षेत्रफळ असलेल्या मंगल कार्यालयात ५०० ते १००० लोकांना किंवा हॉल क्षमतेच्या निमपट लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी का नाही व केंद्र सरकारच्या निर्णयानुसार २००लोकांना व महाराष्ट्र सरकारच्या निर्णयानुसार १०० लोकांना व नगर जिल्हा अधिकारी नुसार फक्त ५० लोकांना विवाह समारंभ साठी उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे.
मंगल कार्यालय मध्ये भीती निर्माण झाली आहे. यासाठी मंगल कार्यालय चालकांनी कोरोना काळातील वीज बिल माफ करावे अशी मागणी केली आहे, व लग्न सोहळ्यामुळे १५०ते ३०० कुटुंबांना रोजगार मिळतो. जर सरकारने परवानगी दिली तर लाखो लोकांना रोजगार मिळू शकतो व यामुळे थांबलेले अर्थ चक्र फिरू शकते, व लवकरात लवकर या निर्णयावर पाऊल उचलावे व ५०० ते १००० लोकांना मंगल कार्यालयामध्ये परवानगी द्यावी. अशी मागणी संगमनेर मंगल कार्यालय चालक संघटनेने केली आहे.

