shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शिर्डीचे पोलीस उपविभागीय अधिकारी म्हणून संजय सातव यांनी स्वीकारला पदभार..!!

सावळीविहीर( प्रतिनिधी) :
शिर्डीचे पोलीस उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या जागेवर नव्याने संजय सातव हे बदलून आले आहेत. त्यांनी आज सोमवार दिनांक 5 ऑक्टोबर रोजी शिर्डी येथे येऊन आपला पदभार स्वीकारला आहे. शिर्डी येथील उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाकचौरे हे सुमारे तीन ते साडेतीन वर्षा पासून शिर्डी येथे कार्यरत होते. त्यांची नुकतीच बदली झाली आहे. त्यांच्या जागेवर शिर्डी येथे कर्जत येथून संजय सातव हे पोलीस उपविभागीय अधिकारी म्हणून आले असून त्यांनी आज सोमवार दिनांक पाच ऑक्टोबर रोजी पदभार स्वीकारला आहे.

ते एक कर्तव्यदक्ष व शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ओळखले जातात .शिर्डी हे श्री साईबाबा मुळे आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र आहे. येथे नेहमी व्हीआयपी लोकांची वर्दळ असते. तसेच शिर्डी पोलीस उपविभागीय कार्यालय अंतर्गत पाच पोलीस ठाणे येतात. कोपरगाव शहर ,कोपरगाव तालुका ,राहता, शिर्डी, लोणी हे पोलीस स्टेशन शिर्डी पोलीस उपविभागीय कार्यालय अंतर्गत आहेत. शिर्डी पोलीस उपविभागीय अधिकारी म्हणून सातव यांनी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांचे शिर्डी सह राहाता , कोपरगाव तालुक्यातून स्वागत होत आहे. व त्यांच्याकडून चांगल्या कार्याची सर्वांना अपेक्षा आहे.
close