shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मंडप व्यवसायास परवानगी द्याअन्यथा मंत्रालयासमोर उपोषण करू ...इंदापूर तालुका मंडप मालक संघटनेचा इशारा..!!

इंदापूर । प्रतिनिधी तात्याराम पवार
इंदापूर दि. 5 ऑक्टोबर 2020 रोजी इंदापूर तालुका मंडप मालक संघटना यांच्यावतीने जुन्या मार्केट कमिटी पासून ते तहसील कचेरी पर्यंत मूक मोर्चा काढून इंदापूर तहसीलदार यांना परवानगी मिळण्याबाबत व विविध मागण्यांचा निवेदन देण्यात आले.


शासनाने लोक डाऊन जाहीर केल्यापासून मंडप व्यवसायिक संकटात असून शासनाकडून अनलाॅक 5 ची नियमावली जाहीर झाली मात्र अद्यापही मडप व्यवसायिकांना व्यवसायाला परवानगी देण्यात आली नसल्याने  मंडप व्यवसायिकांनी इंदापूर तहसील कार्यालयावर मुक मोर्चा काढला आज सोमवार  रोजी मुक मोर्चा काढत आंदोलन केले.


शासनाने व्यवसायकांच्या परिस्थितीची जाणीव ठेऊन व्यवसायिकांना व्यवसाय करण्यास परवानगी द्यावी अन्यथा मंत्रालयावर मोर्चा धडकवू असा थेट इशारा व्यवसायिकांनी दिला आहे.

जुनी कृषि उत्पन्न बाजार समिती मधून सकाळी अकरा वाजता हा मुक मोर्चा पुणे सोलापूर मार्गावरुन तहसील कार्यालयावर दाखल झाला. मंडप व्यवसायिकांच्या मुख्य मागण्यांचे लेखी निवेदन तहसीलदार सोनाली मेटकरी यांना देण्यात आले. यावेळी  तालुकाध्यक्ष रविंद्र कासार,उपाध्यक्ष टिंकू ढवसळकर,खजिनदार बंडू मुलाणी,सचिव विजय राऊत,दादा पठाण,अख्तर मोमिण,प्रदीप कांबळे,नानासाहेब बोराटे, नितीन ढावरे, गणेश भोसले,  साऊंड लाईट जनरेटर असोसिएशनचे कार्याध्यक्ष गोरख माने,जयवंत माने यांसह माळशिरस,करमाळा व माढा  तालुक्याचे पदाधिकारी उपस्थित होते.
close