संगमनेर शहरात गुटख्याच्या गोडाऊन वर छापा, एक लाखाचा गुटखा जप्त.!!.

संगमनेर प्रतिनिधी : ऋषिकेश जगताप ;

संगमनेर शहरात पोलिस कारवाई करण्यात आली. संगमनेर शहरामध्ये एका व्यापाऱ्याच्या गोडाऊन वर संगमनेर पोलिसांनी २८-११-२० ला दुपारी ३, च्या सुमारास छापा टाकला या छाप्यात १,६,३४६, रुपयांचा गुटका संगमनेर शहर पोलिसांनी जप्त केला असून गुटका विरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 


शहरातील अभंग मळा येथे संजय बाबुलाल लुकड, वय,४५ , वर्ष हा आपल्या गोडाउन मध्ये मोठ्या प्रमाणात गुटखा साठा करत असल्याची माहिती संगमनेर शहर पोलिसांना मिळाली होती. संगमनेर विभागाचे उप अधिकारी राहुल मदने यांच्या मार्गदर्शनाखाली मुकुंद देशमुख व त्यांच्या पथकाने दिनांक २८-११-२० ला दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास लुकड यांच्या गोडाऊन वर छापा टाकला. यामध्ये विविध कंपन्यांचे गुटखा साठवून ठेवल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी गुटख्याचा पंचनामा करून सदर गुटखा ताब्यात घेतला.
 
यांच्या विरोधात भा, द, वी, कलम , १८८,२५२,२७३,३२८, यासह विविध कलमांनी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.